
टीम इंडियाचा युवा आणि स्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याला मोठी खेळी करण्यापासून रोखणं गोलंदांजांसाठी आव्हानात्मक ठरु लागलं आहे. अभिषेक टी आशिया कप 2025 स्पर्धेत बांगलादेश विरुद्धही आपला झंझावात कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे. अभिषेकने पाकिस्तान विरुद्ध रविवारी 21 सप्टेंबर रोजी विजयी धावांचा पाठलाग करताना 74 धावा केल्या होत्या. त्यानंतर अभिषेकने आता 24 सप्टेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाच्या सुपर 4 मधील दुसऱ्या सामन्यामध्ये सलग दुसरं अर्धशतक ठोकलं. अभिषेकने 200 च्या स्ट्राईक रेटने बांगलादेश विरुद्ध 25 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. अभिषेकने बांगलादेश विरुद्ध एकूण 75 धावा केल्या. अभिषेकने यासह मोठा विक्रम आपल्या नावावर केला. अभिषेक आशिया कप स्पर्धेतील नवा सिक्सर किंग ठरला.
अभिषेकने बांगलादेश विरुद्ध संयमी सुरुवात केली. अभिषेकने पहिल्या 9 बॉलमध्ये 9 रन्स केल्या. मात्र अभिषेकने ठराविक वेळेनंतर गिअर बदलला. अभिषेकने त्यांनतर मागे वळून पाहिलं नाही. अभिषेकने मैदानात चौफेर फटकेबाजी करत गोलंदाजांना झोडलं. अभिषेकने अशाप्रकारे 36 बॉलमध्ये नॉट आऊट 75 रन्स केल्या होत्या . त्यामुळे अभिषेक सहज शतक करेल, असं वाटत होतं. मात्र अभिषेक कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या चुकीच्या कॉलवर रन आऊट झाला. अशाप्रकारे अभिषेकच्या खेळीचा शेवट झाला. अभिषेकने 37 बॉलमध्ये 6 फोर आणि 5 सिक्ससह 75 रन्स केल्या.
अभिषेकने या 75 धावांच्या खेळीसह एका झटक्यात अनेक दिग्गजांना मागे टाकलं आहे. अभिषेकने 1-2 नाही तर तब्बल चौघांना मागे टाकत मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. सूर्या एका आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक षटकार लगावणारा पहिल फलंदाज ठरला आहे. अभिषेकने श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज आणि विद्यमान मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांचा एका आशिया कप स्पर्धेत सर्वाधिक षटकारांचा रेकॉर्ड ब्रेक केला. तसेच अभिषेकने रोहित शर्मा, शाहिद आफ्रिदीसह रहमानुल्लाह गुरुबाझ या तिघांना मागे टाकलं.
दरम्यान अभिषेकच्या नावावर या सामन्याआधी आशिया कप स्पर्धेतील एका हंगामात 12 सिक्सची नोंद होती. मात्र अभिषेकने या 5 सिक्ससह पाचव्या स्थानावरुन थेट पहिल्या स्थानी झेप घेतली.