AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: कसोटी मालिकेआधीच मुंबईकर खेळाडूची पोलखोल, कॅप्टन रोहित डच्चू देणार!

India vs Bangladesh Test Series: टीम इंडिया अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर सप्टेंबर महिन्यात बांगलादेश विरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेतून रोहितच्या विश्वासू खेळाडूला डच्चू मिळण्याची शक्यता अधिक आहे.

IND vs BAN: कसोटी मालिकेआधीच मुंबईकर खेळाडूची पोलखोल, कॅप्टन रोहित डच्चू देणार!
shreyas iyer rohit sharma team indiaImage Credit source: shreyas iyerX Account
| Updated on: Aug 30, 2024 | 10:08 PM
Share

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यानंतर आता थेट सप्टेंबर महिन्यात मायदेशात कसोटी मालिका खेळणार आहे. बांगलादेश कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. उभयसंघात 2 सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. सलामीचा सामना हा 19 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान चेन्नईत आयोजित करण्यात आला आहे. तर दुसरा सामना हा 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान कानपूर येथे होणार आहे.त्याआधीच टीम इंडियातील एका मुंबईकर खेळाडूची पोलखोल झाली आहे. कॅप्टन रोहित शर्माचा खास भिडू असलेल्या या खेळाडूने बॅटिंगने निराशा केली आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित त्याच्या भिडूला बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेतून वगळू शकतो.

टीम इंडियाचे खेळाडू सध्या बुची बाबू स्पर्धेत खेळत आहेत. बांगलादेश विरूद्धच्या मालिकेसाठी खेळाडूंना या स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन संघात स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. निवड समितीचंही या स्पर्धेत कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे लक्ष अहे. मात्र श्रेयस अय्यरने टीम इंडियात कमबॅकची संधी गमावली आहे. श्रेयसने बूची बाबू स्पर्धतील पहिल्या सामन्यात टीएनसीए ईलेव्हन विरुद्धन निराशाजनक कामगिरी केली आहे. श्रेयसने पहिल्या डावात 2 तर दुसर्‍या डावात 22 धावा केल्या.

श्रेयस स्पिन बॉलिंग विरुद्ध उघडा पडला. लेफ्ट आर्म स्पिनर साई किशोर याने श्रेयसला पहिल्या डावात आऊट केलं. तर दुसऱ्या डावात त्याला सुरुवात मिळाली, मात्र त्याला 25 पारही जाता आलं नाही. अशात कॅप्टन रोहित आणि बीसीसीआय निवड समिती श्रेयसला बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेतून डच्चू मिळू शकतो.

श्रेयस दोन्ही डावात अपयशी

कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 19 ते 23 सप्टेंबर, चेन्नई

दुसरा सामना, 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, कानपूर

बांगलादेश विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संभावित संघ : रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.