AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 1st ODI: इंग्लंड विरुद्ध पहिली वनडे, विराटच्या जागी ‘या’ खेळाडूला मिळू शकते संधी

IND vs ENG 1st ODI: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आजपासून तीन वनडे सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु होत आहे. आज ओव्हल (Oval) मध्ये पहिला सामना होणार आहे.

IND vs ENG 1st ODI: इंग्लंड विरुद्ध पहिली वनडे, विराटच्या जागी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी
virat-kohli Image Credit source: instagram
| Updated on: Jul 12, 2022 | 10:55 AM
Share

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आजपासून तीन वनडे सामन्यांची मालिका (ODI Series) सुरु होत आहे. आज ओव्हल (Oval) मध्ये पहिला सामना होणार आहे. टी 20 सीरीज मधल्या शानदार विजयामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास उंचावला आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाचा इरादा आजचा सामना जिंकून विजयी प्रारंभ करण्याचा असेल. यजमान इंग्लंडचा संघ नेदरलँड विरुद्ध शेवटची वनडे सीरीज खेळला होता. 3-0 ने त्यांनी ही मालिका जिंकली होती. या सीरीजच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने 498 धावांचा विश्वविक्रम केला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वाधिक धावसंख्या आहे. भारतीय संघाने यंदाच्यावर्षी दोन वनडे सीरीज खेळल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतील वनडे मालिकेत भारताचा 3-0 ने पराभव झाला. त्यानंतर मायदेशात झालेल्या मालिकेत भारताने वेस्ट इंडिजला 3-0 असं पराभूत केलं.

इंग्लंडच्या टीम मध्ये कोण असेल?

या सीरीज साठी भारत आणि इंग्लंडचे मजबूत संघ मैदानात उतरणार आहेत. इंग्लंडच्या संघात फॉर्म मध्ये असलेले जॉनी बेयरस्टो, ज्यो रुट आणि बेन स्टोक्स हे खेळाडू असतील. भारतीय संघात शिखर धवन, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी दिसतील.

टीम इंडियाच्या ओपनिंग मध्ये बदल

शिखर धवन संघात परतल्याने ओपनिंग मध्ये बदल दिसून येईल. शिखर धवन रोहित शर्मासोबत सलामीला येईल. विराट कोहली ग्रोइन इंजरीमुळे सलामीच्या सामन्यात खेळण्याची शक्यता नाहीय. विराट कोहली खेळला नाही, तर त्याच्याजागी इशान किशनला संधी मिळू शकते. शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्णा यापैकी एकाला संधी मिळू शकते.

अशी असेल टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

रोहित शर्मा (कॅप्टन), शिखर धवन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा/शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल

इंग्लंडची संभाव्या प्लेइंग 11

जोस बटलर (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, ज्यो रुट, लियान लिव्हिंगस्टोन, बेन स्टोक्स, जेसन रॉय, मोइन अली, सॅम करण, डेविड विली, मॅथ्यू पार्किंसन, रीस टॉप्ली,

Follow Us
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
महायुती टिकवायची असेल तर...; भाजपचा मित्रपक्षाला इशारा
BJP Vs Shivsena : महायुती टिकवायची असेल तर झारीतील शुक्राचार्यांवर कारवाई करा; भाजपचा मित्रपक्षाला इशारा...
माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये; नवनाथ बन यांनी कोणाला सुनावलं
Navnath Ban : 12 पक्ष बदलले नाही...माकडछाप ब्रँडने भाजपला शहाणपण शिकवू नये...; नवनाथ बन यांचा रवींद्र धंगेकरांवर घणाघात
ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
Shivsena : ठाण्यातल्या शिवसेनेच्याच नगरसेवकांची आंदोलनाकडे पाठ; नेमकं काय घडलं?
ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला?....
Vijay Wadettiwar : ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार? रवींद्र धंगेकर यांना कुठे सिग्नल मिळाला तो त्यांनी सांगावा...
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले