AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हॅरी ब्रूकचं नशिब फुटकं! हेडिंग्लेवर नर्व्हस 90 चा शिकार ठरलेला तिसरा खेळाडू

भारताने पहिल्या डावात केलेल्या 471 धावांचा पाठलाग इंग्लंडच्या खेळाडूंनी केला. त्यामुळे पहिल्या डावात मोठी धावसंख्या करूनही टीम इंडिया बॅकफूटवर गेली. असं असातना मधल्या फळीत हॅरी ब्रूकने टीम इंडियाला चांगलंच झुंजवलं. पण शतक मात्र एका धावेने हुकलं.

हॅरी ब्रूकचं नशिब फुटकं! हेडिंग्लेवर नर्व्हस 90 चा शिकार ठरलेला तिसरा खेळाडू
हॅरी ब्रूकचं नशिब फुटकं! हेडिंग्लेवर नर्व्हस 90 चा शिकार ठरलेला तिसरा खेळाडूImage Credit source: Gareth Copley/Getty Images
| Updated on: Jun 22, 2025 | 8:22 PM
Share

भारत इंग्लंड कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी भारताला सर्वाधिक त्रास हा हॅरी ब्रूकने दिला. ओली पोपची विकेट गेल्यानंतर त्याने भारतीय संघाला कडवी झुंज दिली. त्याने 88.39 च्या स्ट्राईक रेटने गोलंदाजांना धुतलं. त्यामुळे 471 धावा करूनही भारतीय संघाला हवी तशी आघाडी घेता आली नाही. त्याने 112 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकार मारत 99 धावा केल्या. पण त्याचं शतक मात्र एका धावेने हुकलं. हेडिंग्लेवर 99 धावांवर बाद होणारा हॅरी ब्रूक हा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 1987 मध्ये सलिम मलिक आणि 1994 मध्ये मायकल एथरटन 99 धावांवर बाद झाला. त्यानंतर आता हॅरी ब्रूक बाद झाला आहे. अशा पद्धतीने या मैदानात बाद होणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. हॅरी ब्रूक आपल्या कसोटी कारकि‍र्दीतलं 9 वं शतक करण्यापासून चुकला. दरम्यान, हॅरी ब्रूकला इथपर्यंत पोहोतचाना तीन वेळा जीवदान मिळालं होतं. पण चौथ्यांदा नशिबाची काही साथ मिळाली नाही.

हॅरी ब्रूकला पहिलं जीवदान शून्यावरच मिळालं होतं. दुसऱ्या दिवशी शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजी झेल बाद झाला होता. मात्र नो बॉल असल्याने जीवदान मिळालं. दुसऱ्यांदा 42 धावांवर असताना विकेटकीपर ऋषभ पंतने झेल सोडला. 83 धावांवर असताना यशस्वी जयस्वालने झेल सोडला. त्यामुळे हॅरी ब्रूक डोकेदुखी ठरणार असंच वाटत होतं. पण प्रसिद्ध कृष्णाने त्याला बरोबर जाळ्यात ओढलं. शार्दुल ठाकुरने त्याचा झेल पकडताना कोणतीच चूक केली नाही. दरम्यान टीम इंडियाची फिल्डिंग खूपच खराब राहिली. हॅरी ब्रूक आऊट होईपर्यंत सहा झेल सोडले.

दुसरीकडे शेपटाच्या फलंदाजांना बाद करताना भारतीय गोलंदाजांचा घाम निघाला. गोलंदाजांनी उत्तम फलंदाजी करत 465 धावांचा पल्ला गाठला. त्यामुळे या डावात भारताला नाममात्र 6 धावांची आघाडी मिळाली आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. त्यामुळे पहिल्या डावात भारतीय संघ बॅकफूटवर गेला आहे, असंच म्हणावं लागेल. आता इंग्लंडचा संघ तंबूत परतल्यानंतर भारतीय खेळाडूंना दमदार खेळी करावी लागेल. अन्यथा इंग्लंड बेजबॉल पॅटर्न हा सामना आपल्या पारड्यात टाकू घेईल.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.