AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 2nd ODI: युजवेंद्र चहलच्या फिरकी समोर इंग्लिश फलंदाज ढेपाळले, भारताला 247 धावांचे टार्गेट

IND vs ENG 2nd ODI: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा वनडे सामना सुरु आहे. (Lords Ground) भारताचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IND vs ENG 2nd ODI: युजवेंद्र चहलच्या फिरकी समोर इंग्लिश फलंदाज ढेपाळले, भारताला 247 धावांचे टार्गेट
team india
| Updated on: Jul 14, 2022 | 9:27 PM
Share

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर दुसरा वनडे सामना सुरु आहे. (Lords Ground) भारताचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या टीमने प्रथम फलंदाजी करताना 49 षटकात 246 धावांवर ऑलआऊट झाला. इंग्लंडकडून मोइन अलीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 64 चेंडूत 47 धावा फटकावल्या. यात दोन चौकार आणि दोन षटकार आहेत. भारताकडून युजवेंद्र चहल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने इंग्लंडला हादरे दिले. 10 षटकात 47 धावा देत त्याने चार विकेट घेतले. जॉनी बेयरस्टो (38), ज्यो रुट (11) आणि बेन स्टोक्स (21) हे महत्त्वाचे विकेट चहलने घेतले. मोइन अलीने खेळपट्टीवर पाय रोवले होते. त्यावेळी चहलनेच त्याला जाडेजाकरवी झेलबाद केलं.

भारताने संधी दवडली

इंग्लंडचा निम्मा संघ 102 धावात तंबुत परतला होता. पण भारतीय गोलंदाजांना त्याचा फायदा उचलता आला नाही. लियाल लिव्हिंगस्टोन (33), मोइन अली (47) आणि डेविड विली (41) यांच्या फलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ 246 पर्यंत पोहोचला. सातव्या विकेटसाठी विली आणि मोइन अलीमध्ये सर्वाधिक 62 धावांची भागीदारी झाली.

पहिल्या सामन्याप्रमाणे सुरुवात जमली नाही

दुसऱ्या वनडेत भारताला पहिल्या सामन्याप्रमाणे सुरुवात करता आली नाही. पहिल्या सामन्यात भारताने सुरुवातीच्या षटकातच इंग्लंडला तडाखे दिले होते. आजच्या सामन्यात भारताला तसं करणं जमलं नाही. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टोने आज चांगली सुरुवात केली. जेसन रॉयच्या रुपाने 41 धावांवर इंग्लंडची पहिली विकेट गेली. रॉय 23 धावांवर हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर आऊट झाला. त्याने सूर्यकुमार यादवकडे झेल दिला. जेसन रॉयने 33 चेंडूत 23 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 1 षटकार आहेत.

विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न

भारत आणि इंग्लंड मध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज विजयी आघाडी मिळवण्याचा भारताचा पुरेपूर प्रयत्न असेल. नुकत्याच संपलेल्या टी 20 मालिकेत भारताने दमदार कामगिरी केली. भारताने 2-1 ने ही मालिका जिंकली होती. आता वनडे मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार