IND vs ENG : दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडचं भारतासमोर 305 धावांचं आव्हान, रोहित-विराटच्या खेळीकडे लक्ष
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडने सावध पण चांगली खेळी केली. पहिल्या सामन्यात इंग्लंडचा डाव 248 धावांवरच आटोपला होता. तेव्हा कर्णधार जो बटरलने 30-40 धावा कमी पडल्याचं सांगितलं होतं. पण आता 305 स्कोअर असून टीम इंडियाची कसोटी लागणार आहे.

दुसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पहिल्या सामन्यात इंग्लंडने शेवटी चांगली गोलंदाजी केली होती. पण तेव्हा 30-40 धावा कमी पडल्या होत्या. आता पहिल्या सामन्याच्या तुलनेत जास्त धावा आहेत. इंग्लंडने 49.5 षटकात 10 गडी गमवून 304 धावा केल्या आणि विजयासाठी 305 धावांचं आव्हान दिलं आहे. या सामन्यात विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्माकडून फार अपेक्षा आहेत. हे दोन्ही खेळाडू सध्या फॉर्म गमवून बसले आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी या दोघांकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे. दरम्यान, दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडकडून बेन डकेट आणि जो रूट यांची बॅट तळपली. दोघांनी अर्धशतकी खेळी करून इंग्लंडला सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. बेन डकेटन 56 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 65 धावा केल्या. तर जो रूटने 72 चेंडूत 69 धावांची खेळी केली. यावेळी त्याने 6 चौकार मारले.
दुसऱ्या वनडे सामन्यात रविंद्र जडेजाची फिरकी चांगलीच चालली. त्याने बेन डकेट आणि जो रूट या दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. रविंद्र जडेजाचा फॉर्म चांगला असून चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दिलासादायक बातमी आहे. रविंद्र जडेजाने 10 षटकात 35 धावा देत तीन गडी बाद केले. यात त्याने षटक निर्धाव टाकलं. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने 10 षटकात 54 धावा देत 1 गडी बाद केला.
खरं तर इंग्लंड या सामन्यात आरामात 325 धावांचा आकडा गाठेल असं वाटत होतं. इंग्लंडने शेवटच्या दोन षटकात 7 धावा करत तीन विकेट गमवल्या. इंग्लंड पूर्ण 50 षटक खेळू शकली नाही. शेवटच्या षटकाचा एक चेंडू शिल्लक राहिला. शेवटचे तिन्ही खेळाडू रन आऊट झाले हे विशेष
दोन्ही संघांची प्लेइंग 11
इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप साल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद, मार्क वूड, साकिब महमूद.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती.
