AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : टीम इंडियाने जिंकला नाणेफेकीचा कौल, सूर्यकुमार यादवने घेतला असा निर्णय

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा टी20 सामना आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने लागला. खेळपट्टीचा अंदाज घेऊन कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs ENG : टीम इंडियाने जिंकला नाणेफेकीचा कौल, सूर्यकुमार यादवने घेतला असा निर्णय
Image Credit source: BCCI
| Updated on: Jan 25, 2025 | 6:55 PM
Share

भारताने दुसर्‍या टी20 सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकला. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या डावातील दव फॅक्टर लक्षात घेऊन टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवने सांगितलं की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करू. एक चांगला ट्रॅक दिसत आहे, संध्याकाळी विकेट चांगली होईल अशी आशा आहे. आम्हाला मूलभूत गोष्टींवर टिकून राहायचे आहे. खरोखर खेळाची वाट पाहत आहे. क्षेत्ररक्षण ही एक गोष्ट आहे जी सर्वांना एकत्र आणते. नितीश बाहेर गेला आहे.रिंकू एक-दोन सामन्यांना मुकेल. वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांना संघात स्थान मिळालं आहे.’ इंग्लंडचा कर्णधार जोस बटरलने सांगितलं की, ‘आम्हीही प्रथम गोलंदाजी केली असती. तसाच गेमप्लॅन आहे पण अधिक चांगले करू. आशा आहे की ती चांगली खेळपट्टी आणि सामना असेल. बेथेलची तब्येत बिघडली आहे त्यामुळे जेमी स्मिथ आत आला आहे. ऍटकिन्सनऐवजी कार्सला संधी मिळाली आहे.’

पिच रिपोर्ट पाहता, हे एक मोठं ग्राउंड आहे. बाउंड्री लाईन 68m आणि 66m आणि 75m आहे. या खेळपट्टीवर काही क्रॅक आहेत आणि चांगले आच्छादन आहे. थोडंफार गवतही आहे. त्यामुळे कुठेतरी 180 च्या आसपास धावा होऊ शकतात. फिरकीसाठी खूप चांगली खेळपट्टी आहे. थोडीशी खेळपट्टी मंद होऊ शकते कारण ही काळ्या मातीची खेळपट्टी आहे. त्यामुळे भारताच्या ताफ्यात रवी बिश्नोई, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि वरुण चक्रवर्ती आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी स्मिथ, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वुड

धंगेकरांचा भाजपविरोधात स्वबळाचा नारा तर दादांच्या NCPबद्दल काय भूमिका?
धंगेकरांचा भाजपविरोधात स्वबळाचा नारा तर दादांच्या NCPबद्दल काय भूमिका?.
18 ठिकाणी शिंदे एकटे म्हणून कॅबिनेटला दांडी? युती न झाल्यानं नाराज?
18 ठिकाणी शिंदे एकटे म्हणून कॅबिनेटला दांडी? युती न झाल्यानं नाराज?.
संभाजीनगरात रशीद मामूंना तिकीट अन् ठाकरे गटातील खैरे-दानवे भिडले
संभाजीनगरात रशीद मामूंना तिकीट अन् ठाकरे गटातील खैरे-दानवे भिडले.
उत्तर भारतीय महापौर... भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ अन्
उत्तर भारतीय महापौर... भाजपच्या बड्या नेत्याच्या वक्तव्यानं खळबळ अन्.
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.