AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची अशी आहे प्लेइंग 11, तीन जणांना संधी; पण…

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत.

IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची अशी आहे प्लेइंग 11, तीन जणांना संधी; पण...
IND vs ENG : दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची अशी आहे प्लेइंग 11, तीन जणांना संधी; पण...Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 02, 2025 | 4:03 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दुसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅक कमबॅक करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. दरम्यान, नाणेफेकीचा कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सांगितलं की, ‘आम्ही गोलंदाजी करणार आहोत. ओव्हरहेड परिस्थिती अनुकूल आहे. सर्वकाही विचारात घेतले. गेल्या आठवड्यात खूप चांगली सांघिक कामगिरी, आम्हाला विश्वास आहे. कसोटीच्या खोलवर जाताना तुम्ही परिस्थिती चांगल्या प्रकारे समजून घेता. मालिकेच्या सुरुवातीलाच धावांचा यशस्वी पाठलाग केला.पण या आठवड्यात लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.’दुसरीकडे, नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर शुबमन गिलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. साई सुदर्शन आणि शार्दुल ठाकुरला आराम दिला आहे.

शुबमन गिल म्हणाला ‘मीही प्रथम गोलंदाजी केली असती. जर विकेटमध्ये काही असेल तर ते पहिल्या दिवशी दिसेल. संघात तीन बदल केले आहेत. रेड्डी, वाशी आणि आकाश दीप आले आहेत. बुमराह नाही. फक्त त्याच्या कामाचा ताण सांभाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा सामना आहे. पण तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर असल्याने आम्हाला वाटते की त्या खेळपट्टीवर आणखी काही असेल म्हणून आम्ही त्याचा वापर करू. आम्हाला कुलदीपला खेळवण्याचा मोह झाला होता पण शेवटच्या सामन्याकडे पाहता आमच्या खालच्या फळीने चांगली कामगिरी केली नाही, म्हणून फलंदाजीत थोडी खोली जोडण्याचा निर्णय घेतला.’

दोन्ही संघाची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा