IND vs ENG | दुसऱ्या कसोटीत कॅप्टन रोहित रचणार इतिहास! धोनीला पछाडणार?

Rohit Sharma | रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाला इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया जोमाने मैदानात उतरणार आहे. या सामन्यात कॅप्टन रोहितला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

IND vs ENG | दुसऱ्या कसोटीत कॅप्टन रोहित रचणार इतिहास! धोनीला पछाडणार?
Follow us
| Updated on: Jan 30, 2024 | 7:23 PM

मुंबई | टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाहुण्यांनी विजयी सलामी दिली. त्यानंतर आता उभयसंघात 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान दुसरा सामना होणार आहे. हा दुसरा सामना विशाखापट्टणममधील डॉ वाय एस राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करेल. तर बेन स्टोक्स याच्या नेतृत्वात इंग्लंड खेळेल. टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात पूर्ण ताकदीनिशी उतरेल. कॅप्टन रोहित शर्माला या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

धोनीला पछाडण्याची संधी

रोहित शर्मा याने कसोटी, वनडे आणि टी 20 अशा तिन्ही प्रकारात एकूण 468 सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. रोहितने यापैकी टीम इंडियाच्या 295 सामन्यातील विजयामध्ये खेळाडू म्हणून सहभागी होता . तर रोहित इंग्लंड विरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकताच महेंद्रसिंह धोनीला मागे टाकेल. धोनीने टीम इंडियाचं 535 सामन्यात प्रतिनिधित्व केलं आहे. यापैकी धोनीला खेळाडू म्हणून 295 सामन्यात जिंकता आलंय.

खेळाडू म्हणून सर्वाधिक सामने कोण जिंकलाय?

दरम्यान टीम इंडियासाठी खेळताना सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम हा विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. विराट कोहली याने टीम इंडियाचे सर्वाधिक 313 विजय साजरे केले आहेत. तर दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर आहे. सचिन टीम इंडियाच्या 300 विजयांमध्ये खेळाडू म्हणून सहभागी होता. अशात आता रोहितलाही विजयाचं त्रिशतक पूर्ण करण्यासाठी 5 विजयांची गरज आहे.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियासाठी सर्वाधिक सामने जिंकणारे खळाडू

विराट कोहली – 313 विजय सचिन तेंडुलकर – 307 विजय रोहित शर्मा – 295 विजय महेंद्रसिंह धोनी – 295 विजय युवराज सिंह – 227 विजय

इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

कसोटी मालिकेसाठी इंग्लंड टीम | बेन स्टोक्स (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टली, मार्क वुड, जॅक लीच, ऑली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन, डॅनियल लॉरेन्स आणि गस ऍटकिन्सन.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.