AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 2nd Test : शार्दुल ठाकुरसह या खेळाडूचा पत्ता कापला जाणार! गिल-गंभीर घेणार मोठा निर्णय?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला कमबॅक करावं लागेल. कारण इंग्लंडने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात टीम इंडियाची गोलंदाजी सुमार राहिली. त्यामुळे संघात दोन बदल होण्याची शक्यता आहे.

IND vs ENG 2nd Test : शार्दुल ठाकुरसह या खेळाडूचा पत्ता कापला जाणार! गिल-गंभीर घेणार मोठा निर्णय?
टीम इंडिया कसोटी संघImage Credit source: Rishabh Pant Twitter
| Updated on: Jun 25, 2025 | 4:36 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने बाजी मारली. त्यामुळे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे भारतावर दुसऱ्या कसोटी सामन्याआधीच दबाव वाढला आहे. टीम इंडियाने पहिल्या कसोटी सामन्यात पाच शतकं ठोकली. मात्र असं असूनही पराभवाचं तोंड पाहावं लागलं. कारण सुमार गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षण यासाठी कारणीभूत ठरलं आहे. आता दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून एजबॅस्टन स्टेडियममध्ये होणार आहे. यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकुरसह एका स्टार खेळाडूचा पत्ता कापला जाण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकुरसह प्रसिद्ध कृष्णाला दुसऱ्या कसोटी सामन्यातून डावललं जाण्याची शक्यता आहे. दोन्ही खेळाडूंनी निराशाजनक कामगिरी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शार्दुल ठाकुर फलंदाजीतही कामगिरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र दोन्ही डावात फेल गेला. पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 4 धावा केल्या. इतकंच काय तर पहिल्या डावात 6 षटकात 38 धावा दिल्या. दुसऱ्या डावात 10 षटकात 2 विकेट घेतल्या.

प्रसिद्ध कृष्णाकडूनही फार अपेक्षा होत्या. पण त्याच्याकडूनही टीम इंडियाची निराशा झाली. सर्वाधिक धावा देत त्याने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. पहिल्या डावात प्रसिद्ध कृष्णाने 20 षटक टाकली. त्यात एकही षटक निर्धाव टाकलं नाही. तसेच 128 धावा दिल्या. तीन विकेट मिळाल्या पण 6.40 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या. दुसऱ्या डावातही प्रसिद्ध कृष्णा महागडा ठरला. त्याने 15 षटकं टाकली आणि 92 धावा दिल्या. दोन फलंदाजांना बाद केलं पण 6.10 च्या इकोनॉमी रेटने धावा दिल्या.

पहिल्या कसोटी सामन्यात अभिमन्यू ईश्वरन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, आकाश दीप, हार्षित राणा आणि कुलदीप यादव हे खेळाडू बेंचवर बसले होते. आता या खेळाडूंपैकी दोघांनी दुसऱ्या कसोटीत संधी मिळण्याची शक्यता आहे. शार्दुल ठाकुरच्या जागी वॉशिंग्टन सुंदर आणि प्रसिद्ध कृष्णाच्या जागी अर्शदीप सिंगला संधी मिळू शकते. आता प्लेइंग 11 मध्ये काय बदल होणार हे दुसऱ्या कसोटीत नाणेफेकीचा कौल झाल्यावरच कळेल. दुसरीकडे, इंग्लंड संघ या सामन्याआधीच प्लेइंग 11 जाहीर करण्याची शक्यता आहे.

ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल...
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.