IND vs ENG : टीम इंडियात पाचव्या टी 20i सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल फिक्स! कॅप्टन सूर्या कुणाचा पत्ता कापणार?
IND vs ENG 5th T20I Playing XI: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकली आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. मात्र कुणाच्या जागी? कुणाला वगळण्यात येणार? जाणून घ्या.

टीम इंडियाने पुण्यात इंग्लंडविरुद्ध चौथ्या टी 20i सामन्यात 15 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली. टीम इंडियाने यासह मायदेशात 2019 पासून सलग टी 20i मालिका जिंकण्याची परंपरा कायम ठेवली. आता या मालिकेतील पाचवा आणि अंतिम टी 20I सामना हा रविवारी 2 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये हा सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने आधीच मालिका जिंकली असल्याने या अंतिम सामन्यातील प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल होणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.
कुणाला संधी?
टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये पाचव्या सामन्यासाठी हर्षित राणा आणि मोहम्मद शमी या दोघांची एन्ट्री होऊ शकते. शमीने या मालिकेतील तिसरा सामना खेळला होता. मात्र शमीऐवजी चौथ्या सामन्यात अर्शदीप सिंह याला संधी देण्यात आली. तसेच हर्षित चौथ्या सामन्यात शिवम दुबे याच्या हेल्मेटला बॉल लागल्याने कनक्शन सब्स्टीट्यूट म्हणून आला होता. त्यामुळे हर्षितसाठी आता शिवम दुबेला पाचव्या सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते.
शिवम दुबेला चौथ्या सामन्यातील पहिल्या डावात बॅटिंग करत होता. शिवम दुबेच्या हेल्मेटवर 20 व्या ओव्हरमधील पाचवा बॉल लागला. त्यामुळे शिवमला दुसऱ्या डावात फिल्डिंगसाठी येता आलं नाही. त्यामुळे हर्षित राणा याची कनक्शन सब्स्टीट्यूटद्वारे मैदानात एन्ट्री झाली. हर्षितने अशाप्रकारे भर सामन्यादरम्यान टी 20I पदार्पण केलं. इतकंच नाही, तर हर्षितने या संधीचा फायदा घेत सामना जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली होती. हर्षितने या सामन्यात 3 विकेट्स घेतल्या होत्या.
पाचव्या टी 20I सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, तिलक वर्मा, रिंकू सिंह, हार्दिक पांड्या, रमनदीप सिंह, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि हर्षित राणा.
टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.
