AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना आजपासून (10 सप्टेंबर) सुरु होणार आहे. सद्यस्थितीला भारत मालिकेमध्ये 2-1 च्या फरकाने आघाडीवर आहे.

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?
भारत विरुद्ध इंग्लंड
| Edited By: | Updated on: Sep 10, 2021 | 10:36 AM
Share

मँचेस्टर : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका आजपासून अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आज मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना सुरु होत आहे. हा सामना भारत जिंकल्यास मालिका भारताच्या नावावर होईल आणि इंग्लंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटू शकते. याचे कारण पहिला सामना अनिर्णीत सुटल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार विजय मिळवला. पण तिसरा सामना इंग्लंडने जिंकत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. पण चौथा सामना भारताने जिंकत मालिकेत 2-1 ची आघाडी घेत मालिका गमावण्यापासूनही स्वत:चा बचाव केला आहे. आता पाचवा सामना भारत जिंकला किंवा अनिर्णीत सुटला तरी भारत 2-1 ने मालिका जिंकेल. दुसरीकडे इंग्लंड सामना जिंकल्यास मालिका 2-2 ने ड्रॉ होईल त्यामुळे भारताची मालिका गमावण्याची शक्यता संपली आहे.

भारतीय संघाचा विचार करता संघात तसा कोणताच बदल होणे शक्य नाही. मात्र भारताचा दिग्गज दौऱ्यातील सर्वात यशस्वी फलंदाज रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे चौथ्या सामन्यात क्षेत्ररक्षण न करता तंबूत विश्रांती करत होता. रोहितच्या गुडघ्याला थोडी दुखापत असल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे त्याची दुखापत अजून ठिक झाली नसल्यास तो सामन्याला मुकू शकतो. त्याच्याजागी मयांक अगरवाल किंवा पृथ्वी शॉला संधी दिली जाऊ शकते. तर इंग्लंडच्या संघात शक्यतो बदल होणार नाही.

सामना कुठे खेळविला जाणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना शुक्रवारी 10 सप्टेंबर रोजी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात खेळवला जाईल.

सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होणार असून 3 वाजता नाणेफेक करण्यात येईल.

सामना कुठे पाहणार?

भारत आणि इंग्लंड संघ यांच्यातील पाचवा कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल.

लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील या सामन्याचं Live Streaming SONY LIVE वर असेल. तसेच सामन्याचे महत्त्वाचे अपडेट्स टीव्ही 9 मराठीच्या या लिंकवर ही तुम्ही पाहू शकता.

इंग्लंड विरुद्ध पाचव्या टेस्टसाठी संभाव्य भारतीय संघ

विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर

इतर बातम्या

T 20 World Cup मध्ये धोनी विरुद्ध रवी शास्त्री वाद रंगला तर?, माजी क्रिकेटपटूने व्यक्त केली भिती

T20 world Cup 2021: टी-20 विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, दोन दिग्गज खेळाडूंना डच्चू

भारतीय संघात स्थान मिळताच ‘या’ दोन युवा खेळाडूंचा आनंद गगनात मावेना, VIDEO पाहून तुम्हालाही वाटेल भारी

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.