IND vs ENG : कसोटीत इंग्लंडला व्हाईट वॉश देणार का? या प्रश्नावर रोहित शर्मा हसला आणि सांगितलं..

भारत इंग्लंड कसोटी मालिकेकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. भारतात टीम इंडियाला पराभूत करणं वाटतं तितकं सोपं नाही. मागच्या कसोटी मालिकेतून हे उघड झालं आहे. यावेळी टीम इंडिया इंग्लंडला व्हाईट वॉश देणार अशी चर्चा रंगली आहे. त्यावर रोहित शर्माने आपल्या अंदाजात उत्तर दिलं आहे.

IND vs ENG : कसोटीत इंग्लंडला व्हाईट वॉश देणार का? या प्रश्नावर रोहित शर्मा हसला आणि सांगितलं..
इंग्लंडला घरच्या मैदानावर 5-0 ने धूळ चारणार का? रोहित शर्मा हसत हसत म्हणाला...
Follow us
| Updated on: Jan 24, 2024 | 5:57 PM

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या दृष्टीने भारत इंग्लंड ही कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. प्रत्येक सामन्यातील निकाल गुणतालिकेचं चित्र बदलणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. त्यासाठी दोन्ही संघांची तयारी झाली आहे. भारताला होम ग्राउंडचा लाभ मिळेल अशी चर्चा क्रीडाप्रेमी करत आहे. भारत आरामात इंग्लंडला 5-0 ने मात देईल असंही सांगितलं जात आहे. पण काही अंशी ही अतिशयोक्ति ठरू शकते. कारण इंग्लंड संघाला दुबळं माननं महागात पडू शकतं. इंग्लंडने मागच्या वेळेस कसोटी भारताला थाऱ्यावर आणलं होतं. पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली होती. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा यावेळी ताकही फुंकून पित आहे. व्हाईट वॉशबाबत प्रश्न विचारल्यानंतर रोहित शर्माने त्यावर आपल्या अंदाजात उत्तर दिलं.

“नाही..नाही..असं मी म्हणू शकत नाही. कधी कधी अशी स्थिती असते की पराभवही होऊ शकतो. पण मागचा रेकॉर्ड पाहता आम्ही आघाडी घेऊ शकतो. आम्ही चांगलं क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करू. इंग्लंड हा एक चांगला संघ आहे. ते कसोटी सामना चांगल्याप्रकारे खेळतात. मागच्या वेळेस इंग्लंडने आम्हाला भारतात पराभूत केलं आहे. पण त्यालाही बराच काळ लोटला आहे. तेव्हाचे खेळाडू आणि आताच्या खेळाडूंमध्ये बराच बदल झाला आहे. पण त्या संघामध्ये अजूनही ती क्षमता आहे. त्यामुळे या मालिकेत आम्ही आमच्या रणनितीनुसार खेळू.”, असं रोहित शर्मा म्हणाला.

2021 साली इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला होता . तेव्हा पहिला सामना ड्रॉ झाला होता. दुसऱ्या सामन्यात भारताने 151 धावांनी विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने कमबॅक करत एक डाव आणि 76 धावांनी पराभूत केलं. चौथा सामना भारताने 157 धावांनी जिंकला. पण कोविडमुळे पाचवा सामना रद्द करण्यात आला. त्यानंतर इंग्लंडमध्ये पाचवा सामना खेळला गेला आणि इंग्लंडने हा सामना 7 विकेट्सने जिंकत मालिका बरोबरीत सोडवली होती.

टीम इंडिया : रजत पाटिदार, रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), श्रीकर भारत (विकेटकीपर), आवेश खान, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार

Non Stop LIVE Update
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर
'लोकसभा असो की विधानसभा विकलेला माल परत नाही', अंधारेंचा रोख कुणावर.
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला
... म्हणून मला संधी नाही; अजित दादांच्या वक्तव्यावरून कुणाचा खोचक टोला.
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले...
भुजबळ तुतारीचा प्रचार करताय, शिवसेना आमदाराच्या वक्तव्यावर म्हणाले....
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर
पदवीधर मतदारसंघ निवडणूक जाहीर, ठाकरे आणि शिंदे गटाकडून ही नावं आघाडीवर.
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप...
काँग्रेससोबत जाऊन ठाकरेंची गद्दारी, आदित्यच्या कपाळावर हवं मेरा बाप....
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज
15 सेकंद पोलीस हटवा, कळणारही नाही की…नवनीत राणांचं ओवैसींना ओपन चॅलेंज.
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक
मनोज जरांगे पाटलांची तब्बल 100 एकरात भव्य सभा, आज संवाद बैठक.
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा
ताई दाओसच्या गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंय हे...शीतल म्हात्रेंचा इशारा.
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ
छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ.
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.