AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : मानलं रे भावा | यशस्वी जयस्वालचं द्विशतक होताच सरफराजच्या ‘त्या’ कृतीवर भारतीय फिदा, पाहा व्हिडीओ

Sarfaraz Khan Viral Video : टीम इंडियाने दुसऱ्या कसोटीध्ये विजय मिळवला असून मालिकेत आता 2-1 ने आघाडी घेतली आहे. सामना संपल्यानंर सोशल मीडियावर सरफराज खान याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. नेमका व्हिडीओ का व्हायरल होतोय जाणून घ्या.

IND vs ENG : मानलं रे भावा | यशस्वी जयस्वालचं द्विशतक होताच सरफराजच्या 'त्या' कृतीवर भारतीय फिदा, पाहा व्हिडीओ
| Updated on: Feb 18, 2024 | 7:05 PM
Share

राजकोट : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघाचा 434 धावांनी पराभव झाला आहे. सामना संपल्यानंतर ऑल राऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. रोहित शर्मा याच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने कसोटी फॉरमॅटमधील सर्वात मोठा विजय मिळवला. युवा खेळाडू यशस्वी जयस्वाल याने केलेल्या नाबाद 214 धावांची द्विशतक खेळी केली. टीम इंडियाने दुसरा डाव घोषित केल्यावर दोन तासांच्या आतमध्ये इंग्लंडचा संघ अवघ्या 122 धावांवर ऑल आऊट झाला. या सामन्यामध्ये सरफराज खान याने डेब्यू केला. जयस्वालने द्विशतक पूर्ण धाव घेतली त्यावेळी सरफराज खान याने मैदानात पाहा काय केलं?

काय आहे व्हिडीओमध्ये

सरफराज खान आणि यशस्वी जयस्वाल दोघे मैदानात होते. जयस्वाल याचं द्विशतक पूर्ण होण्याआधी सरफराज खान याने दुसऱ्या अर्धशताला गवसणी घातली. यादरम्यान जयस्वाल याने दोन धावा घेतल्या नाहीत म्हणून सरफराज त्याच्यावर भडकला होता. त्यानंतर सरफराज याने आपलं दुसरं अर्धशतक पूर्ण केलं. सामन्याच्या 90 व्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर एकेरी धाव घेत जयस्वाल याने आपलं करियरमधील दुसरं द्विशतक पूर्ण केलं.

पाहा व्हिडीओ-:

ज्यावेळी दोन्ही खेळाडी एकेरी धावा घेत होते त्यावेळी दुसऱ्या बाजूने धावत असलेला सरफराजही आनंद व्यक्त करताना दिसला. आपल्या सहकारी खेळाडूने मोठा पराक्रम केल्यावर त्याचा आनंद मोकळ्या मनाने साजरा केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. नेटकरी सरफराज खान यांचं तोंडभरून कौतुक करत आहेत.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.