AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 3rd Test | इंग्लंडच्या पराभवासाठी कोण ठरलं व्हिलन, बेन स्टोक्सने सामन्यानंतर घेतलं नाव!

Ben stokes talk on IND vs ENG 3rd Test : टीम इंडियाने इंग्लंडला पराभूत करत कसोटी क्रिकेट इतिहासामधील सर्वात मोठा विजय मिळवला आहे. या पराभवानंतर कर्णधार बेन स्टोक्स याने सामना कुठे गमावला याबाबत सागितलं आहे.

IND vs ENG 3rd Test | इंग्लंडच्या पराभवासाठी कोण ठरलं व्हिलन, बेन स्टोक्सने सामन्यानंतर घेतलं नाव!
team india ben stokesImage Credit source: team india ben stokes
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Feb 18, 2024 | 8:38 PM
Share

राजकोट : टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना रोहित अँड कंपनीने 434 धावांनी जिंकला आहे. कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाने मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला आहे. टीम इंडियाने दुसरा डाव घोषित केल्यावर इंग्लंडला जिंकण्यासाठी 557 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लिश संघ 122 धावांवर ऑल आऊट झाला. इंग्लंडचा हा कसोटी क्रिकेट इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव आहे. सामना संपल्यानंतर इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स याने नेमका सामना कुढे गमावला हे सांगतिलं आहे.

काय म्हणाला बेन स्टोक्स?

बेन स्टोक्स याने पहिल्या डावात इंग्लंडकडून दीडशे धावांची शानदार खेळी करणाऱ्या बेन डकेट याचं कौतुक केलं. बेन डकेट याने ज्या प्रकारे फलंदाजी केली तोच टोन आम्हाला सेट करायचा होता. टीम इंडियाच्या धावांच्या जवळ पोहोचायचं होतं. मात्र त्यानंतर आमचा डाव गडगडला. आम्हाला गोलंदाजी करायची होती पण अपेक्षेपेक्षा लवकर गोलंदाजी करावी लागल्याचं बेन स्टोक्स याने सांगितलं. पहिल्या डावात इंग्लंड संघाने चांगली सुरूवात केली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी टीम इंडियाकडून सिराज याने तीन तर जडेजाने दोन विकेट घेतल्या. इंग्लंड संघाचा डाव 319 वर आटोपला.

काहीवेळा गेम प्लॅन ठरवल्याप्रमाणे यशस्वी होत नाही. आम्ही हा पराभव विसरून आगामी दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहोत. मात्र आम्हाला पुनरागमन करून मालिका जिंकण्याची मोठी संधी असल्याचं स्टोक्स म्हणाला.

तिसऱ्या कसोटी सामन्याचा धावता आढावा

तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्य डावात टीम इंडियाने 445-10 धावा केल्या होत्या. यामध्ये रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी शतके केली होतीत. तर इंग्लंडला संघ अवघ्या 319 धावांवर ऑल आऊट झाला. टीम इंडिया आघाडी घेत मैदानात उतरली होती.

दुसऱ्या डावात यशस्वी जयस्वाल याची नाबाद 214 धावांची द्विशतकी खेळी आणि शुबमन गिल आणि सरफराज खान यांची अर्धशतकाच्या जोरावर 430-4 धावा  केल्या होत्या. इंग्लंडचा संघ मैदानात उतरल्यावर दीड ते दोन तासाच्या आतमध्ये 122-10 धावांवर आटोपला.  रवींद्र  जडेजाने सर्वाधिक पाच  विकेट घेतल्या.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...