AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG | 6, 6, 6 यशस्वी जयस्वालने जगातील दिग्गज बॉलरला रडवलं, पाहा व्हिडीओ

Yashasvi Jaiswal Hit three six anderason : कसोटी क्रिकेटमधील दिग्गज बॉलर असलेल्या जेम्स अँडरसन याला यशस्वी जयस्वाल याने सलग तीन सिक्स मारले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

IND vs ENG | 6, 6, 6  यशस्वी जयस्वालने जगातील दिग्गज बॉलरला रडवलं, पाहा व्हिडीओ
| Updated on: Feb 18, 2024 | 4:54 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंडमध्ये राजकोट येथे तिसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने 434 धावांनी विजय मिळवला आहे. हे. टीम इंडियचा धडाकेबाज खेळाडू यशस्वी जयस्वाल याने या मालिकेतील दुसरं द्विशतक केलं. 22 वर्षाच्या पोराने नाबाद 214 धावा केल्या, या खेळीमध्ये 14 चौकार आणि 12 षटकार मारले. सात कसोटी सामन्यामध्ये त्याने हा कामगिरी केली आहे. यशस्वीने इंग्लंडचा स्टार बॉलर जेम्स अँडरसन याला रडवलं. सलग तीन सिक्स मारत आपल्यातील लौकिकता जगाला दाखवून दिली.

पाहा व्हिडीओ:-

यशस्वी जयस्वाल हा शतक केल्यावर रिटायर हर्ट झाला होता. शुबमन गिल आऊट झाल्यावर तो परत मैदानात आला आणि सामन्याची सूत्र आपल्या हातात घेतली. 85 व्या ओव्हरमध्ये जेम्स अँडरसनच्या दुसऱ्य तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर षटकार मारले. पहिला फुलटॉस आल्यावर त्याने उचलला  मात्र त्यानंतर दोन्ही बॉलवर जयस्वाल याने षटकार मारले.

जेम्स अँडरसनसारख्या तगड्या बॉलरच्या 22 वर्षाच्या युवा खेळाडूने चिंधड्या उडवून टाकल्या.  अँडरसन याला सिक्स मारल्यावर जयस्वाल याने आपल्या द्विशतकाकडे वाटचाल केली. जयस्वाल याने द्विशतक करण्याआधी  पदार्पणवीर सरफराज खान यानेही आणखी एक अर्धशतक केलं.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), देवदत्त पडीक्कल (सब्स्टीट्यूड), कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड प्लेइंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो, बेन फोक्स (विकेटकीपर), रेहान अहमद, टॉम हार्टले, मार्क वुड आणि जेम्स अँडरसन.

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.