IND vs IRE 2nd T20 Match Report : हुड्डाचं शतक, उमरानच्या ओवरवर टीम इंडिया विजयी, सॅमसननं तोडला रेकॉर्ड

दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी उत्कृष्ट खेळी खेळली. हुडानं टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्यानं 57 चेंडूंत नऊ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. दीपक हुडा हा भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारा चौथा फलंदाज आहे.

IND vs IRE 2nd T20 Match Report : हुड्डाचं शतक, उमरानच्या ओवरवर टीम इंडिया विजयी, सॅमसननं तोडला रेकॉर्ड
हुड्डाचं शतकImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 8:00 AM

नवी दिल्ली : भारतानं (IND) दुसऱ्या टी-20 (T-20) सामन्यात आयर्लंडचा (IRE) चार धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं 20 षटकांत 7 गडी गमावून 225 धावा केल्या. प्रत्युत्तरात आयर्लंडनं 20 षटकांत 5 बाद 221 धावा केल्या. उमरान मलिकनं शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी करत आयर्लंडला 17 धावा करू दिल्या नाहीत. आयर्लंडच्या डावादरम्यान भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकात आयरिश फलंदाजांनी 18 धावा केल्या. T20 क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघानं डावाच्या पहिल्याच षटकात 18 धावा दिल्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 मधील भारतासाठी हे सर्वात महागडे षटक ठरले. यापूर्वी इंग्लंडने 2014 मध्ये बर्मिंगहॅम येथे भारताविरुद्ध पहिल्या षटकात 17 धावा केल्या होत्या आणि 2016 मध्ये लॉडरहिल येथे वेस्ट इंडिजनं 17 धावा केल्या होत्या.

या सामन्यात टीम इंडियासाठी दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांनी उत्कृष्ट खेळी खेळली. हुडानं टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्यानं 57 चेंडूंत नऊ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 104 धावा केल्या. दीपक हुडा हा भारताकडून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारा चौथा फलंदाज आहे. त्याच्या आधी रोहित शर्मा (चार शतके), केएल राहुल (दोन शतके) आणि सुरेश रैनाने (एक शतक) शतके झळकावली आहेत. त्याचवेळी सॅमसननं आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. सॅमसननं 42 चेंडूंत नऊ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीनं 77 धावा केल्या.

हे सुद्धा वाचा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा हुड्डा चौथा भारतीय

T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा हुड्डा चौथा भारतीय ठरला. त्याने 57 चेंडूत नऊ चौकार आणि सहा षटकारांसह 104 धावा केल्या. संजू सॅमसनने त्याला चांगला खेळवत 42 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह 77 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडच्या दुखापतीमुळे सॅमसनला या सामन्यात संधी मिळाली. हुड्डा आणि सॅमसन या दोघांनीही त्यांच्या डावात फटकेबाजी केली.

सुरुवात खराब

भारताची सुरुवात चांगली झाली नाही आणि इशान किशन तीन धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तिसर्‍याच षटकात लॉर्कन टकरकडे मार्क एडायरच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन त्याने आपली विकेट गमावली. यानंतर हुडा आणि सॅमसन यांनी 85 चेंडूत 176 धावांची भागीदारी करत भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.