AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRE vs IND : संजू सॅमसनला मोठी संधी, रोहित शर्माला पछाडणार?

IND vs IRE T20 Series 2026: आगामी आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया टी 20i मालिकेत रोहित शर्मा याचा मोठा विक्रम धोक्यात आहे. संजू सॅमसन याला रोहितचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. जाणून घ्या.

IRE vs IND : संजू सॅमसनला मोठी संधी, रोहित शर्माला पछाडणार?
Sanju Samson Team IndiaImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 24, 2026 | 4:54 PM
Share

टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध टी 20I मालिकेत एकूण 2 सामने खेळणार आहे. या मालिकेला 26 जूनपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसन याला या मालिकेत माजी फलंदाज रोहित शर्मा याचा मोठा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. आयर्लंड-भारत टी 20I मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम हा रोहित शर्मा याच्या नावावर आहे. आता संजूच्या निशाण्यावर रोहितचा विक्रम आहे. त्यामुळे आता संजू रोहितला मागे टाकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संजूला किती धावांची गरज?

रोहित शर्मा भारत-आयर्लंड टी 20I मालिकेत 200 पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाज आहे. रोहित आयर्लंड विरुद्ध 4 टी 20I सामने खेळला आहे. रोहितने या 4 सामन्यांत आयर्लंड विरुद्ध 201 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 3 अर्धशतकं लगावली आहेत. मात्र रोहितने 2024 साली वर्ल्ड कप विजयानंतर टी 20I क्रिकेटमधून निवृत्त घेतली. त्यामुळे आता संजूकडे रोहितला मागे टाकत आयर्लंड विरुद्ध भारताकडून टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम करण्याची संधी आहे.

संजूच्या किती धावा?

संजूने आयर्लंड विरुद्ध 3 टी 20I सामन्यांत 59 च्या सरासरीने आणि 171.01 च्या स्ट्राईक रेटने एकूण 118 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता रोहितला मागे टाकण्यासाठी संजूला या 2 सामन्यांत 84 धावा कराव्या लागणार आहेत.

आयर्लंड विरुद्ध भारत टी 20I मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 26 जून, बेलफास्ट

दुसरा आणि अंतिम सामना, 28 जून, बेलफास्ट

संजू सॅमसन एकमेव

संजू सॅमसन भारताकडून आयर्लंड विरुद्ध टी 20I मालिकेत सर्वाधिक धावा करणारा सक्रीय फलंदाज आहे. संजूनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी विकेटकीपर बॅट्समन ईशान किशन विराजमान आहे. ईशानने भारत विरुद्ध आयर्लंड 2 टी 20I सामन्यांत 29 धावा केल्या आहेत.

मुंबईकर सूर्यांश शेडगेचा समावेश

दरम्यान आयर्लंड विरूद्धच्या या टी 20i मालिकेसाठी मुंबईकर खेळाडूची निवड करण्यात आली आहे. ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला दुखापतीमुळे आयर्लंड विरूद्धच्या टी 20i मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे नितीशच्या जागी आयर्लंड विरुद्ध मुंबईकर फलंदाज सूर्यांश शेडगे याचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता सूर्यांशला पदार्पणाची संधी मिळणार का? याची चाहत्यांना प्रतिक्षा असणार आहे.

Follow Us
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल