IND vs NZ 1st T20 : न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे सीरीजमध्ये टीम इंडियाने क्लीन स्वीप केलं. T20 सीरीजमध्ये टीम इंडियाकडून तशीच सुरुवात अपेक्षित होती. पण असं होऊ शकलं नाही. पहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियावर 21 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. हार्दित पंड्याने टॉस जिंकून पहिली बॉलिंग घेतली. न्यूझीलंडने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 176 धावा केल्या. टीम इंडियाला विजयासाठी 177 धावांच टार्गेट दिलं. न्यूझीलंडच्या बॉलर्सनी टीम इंडियाला 9 बाद 155 धावांवर रोखलं. टीम इंडियाच्या पराभवाला अनेक कारणं आहेत. अर्शदीप सिंहची लास्ट ओव्हर हे त्यापैकी एक प्रमुख कारण आहे.