
कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडवर पहिल्या टी 20I सामन्यात मात करत 2026 वर्षात जोरदार सुरुवात केली. भारताचा हा या वर्षातील पहिलाच विजय ठरला. भारताने 239 धावांचा पाठलाग करणाऱ्या न्यूझीलंडला 190 रन्सवर रोखलं. भारताने यासह हा सामना 48 धावांनी आपल्या नावावर केला. भारताचा हा मायदेशातील 16 टी 20 सामन्यांमधील हा 14 वा विजय ठरला आहे. तसेच भारताने विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात विजयी चौकार लगावला. भारताचा हा या मैदानातील सलग चौथा टी 20I विजय ठरला. भारताने या विजयासोबत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. मात्र फिनिशर रिंकु सिंह याच्या एका चुकीमुळे भारताला 24 धावांचा फटका बसला. रिंकूने ही चूक टाळली असती तर भारताचा आणखी जास्त धावांच्या फरकाने विजय झाला असता. नक्की रिंकुकडून काय चूक झाली? हे जाणून घेऊयात.
रिंकूने न्यूझीलंडच्या मार्क चॅपमॅन याचा कॅच सोडला. त्यामुळे चॅपमॅनला जीवनदान मिळालं. चॅपमॅन या संधीचा फायदा घेऊन न्यूझीलंडला विजयी करण्यात तर यशस्वी ठरला नाही. मात्र त्याने आणखी धावा जोडून पराभवातील अंतर कमी करण्यात निश्चितच योगदान दिलं. तसेच भारताचा या सामन्यात पराभव झाला असता तर रिंकूला त्यासाठी काही प्रमाणात जबाबदार ठरवण्यात आलं असतं.
न्यूझीलंडने 239 धावांचा पाठलाग करताना 10 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 87 रन्स केल्या. मार्क चॅपमॅन आणि ग्लेन फिलिप्स ही सेट जोडी खेळत होती. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 35 धावा जोडल्या होत्या. चॅपमॅन 15 आणि ग्लेन फिलिप्स 48 धावांवर खेळत होता. भारताकडून जसप्रीत बुमराह न्यूझीलंडच्या डावातील 11 वी ओव्हर टाकायला आला. बुमराहने 11 व्या ओव्हरमधील टाकलेल्या पहिल्या बॉलवर चॅपमॅनने फटका मारला. चॅपमॅनने मारलेला फटका हवेत गेला. रिंकु कॅच घेण्यासाठी बॉलखाली आला. मात्र रिंकूचा अंदाज चुकला आणि हातातून कॅच सुटला. अशाप्रकारे चॅपमॅनला जीवनदान मिळालं.
रिंकूकडून मार्क चॅपमॅन याला जीवनदान
Rinku Singh drops Mark Chapman on 15, yet Jasprit Bumrah keeps smiling! 🇮🇳🥲🙆♂️#INDvNZ #T20Is #Nagpur #Sportskeeda pic.twitter.com/25Kqt69KIO
— Sportskeeda (@Sportskeeda) January 21, 2026
चॅपमॅनने या संधीचा फायदा घेत आणखी 24 धावा जोडल्या. त्यानंतर वरुण चक्रवर्ती याने अभिषेक शर्मा याच्या हाती कॅच आऊट करुन चॅपमॅनचा कार्यक्रम केला. चॅपमॅनच्या खेळीचा अशाप्रकारे शेवट झाला. चॅपमॅनने 24 बॉलमध्ये 162.50 च्या स्ट्राईक रेटने या 39 धावा केल्या. चॅपमॅनने या खेळीत 2 षटकार आणि 4 चौकार लगावले.