
Tim Seifet-Devon Conway vs India: चौथ्या टी20 सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल गमावला आणि वाटेला प्रथम फलंदाजी आली. न्यूझीलंडकडून टिम सायफर्ट आणि डेवॉन कॉनव्हे ही जोडी मैदानात सलामीला उतरली. या दोघांनी भारतीय गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं. दोघांनी चौकार आणि षटकारांचा वर्षावर केला. टिम सायफर्टने भारताविरुद्ध सर्वात वेगवान टी20 अर्धशतक ठोकलं. यासह एका विक्रमाची बरोबरी केली. सायफर्टने फक्त 25 चेंडूत 50 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 200च्या आसपास होता. भारताविरुद्ध न्यूझीलंडच्या कोणत्याही फलंदाजाने ठोकलेलं वेगवान अर्धशतक आहे. त्याने हा विक्रम केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांच्यासह शेअर केला आहे. या दोघाने 2020 मध्ये ऑकलँडमध्ये 25 चेंडूत 50 धावा केल्या होत्या.
दुसरीकडे, टिम सायफर्टने डेवॉन कॉनव्हेसह पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 8.2 षटकात 100 धावा केल्या. नवव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडने 100 धावांचा टप्पा गाठला. कॉनव्हेने षटकार मारून ही कामगिरी केली. पुढच्याच चेंडूवर कॉनव्हेने मोठा फटका मारला आणि झेलबाद झाला. यावेळी कॉनव्हेने 23 चेंडूत 44 धावा केल्या. यापूर्वी 2022 टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीनंतर भारताविरुद्ध 100हून धावांची भागीदारी झाली आहे.
नऊ वर्षानंतर कोणत्याही सलामीच्या जोडीने भारताविरुद्ध टी20 सामन्यात भारतात 100हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. यापूर्वी 2017 मध्ये राजकोटमध्ये मार्टिन गप्टिल आणि कॉनिल मुनरो या जोडीने 105 धावा केल्या होत्या. टिम सायफर्ट 36 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकार मारून 62 धावांवर बाद झाला.
2020 पासून आतापर्यंत भारताविरुद्ध न्यूझीलंडने टी20 फॉर्मेटमध्ये 17 ओपनिंग भागीदारी केल्या. यात 50हून अधिक धावा केल्या. यापूर्वी सलामीच्या फलंदाजांना धावा करताना अडचणीचं वाटत होतं. पण यावेळी टिम सायफर्ट आणि डेवॉन कॉनव्हेने सामन्याचं चित्रच पालटलं. या दोघांनी चांगली सुरुवात करून दिली. पण मधल्या फळीतील फलंदाजांना हा रेपो कायम ठेवता आला नाही. त्यामुळे डाव गडगडला. पण डेरिल मिचेल डेथ ओव्हरमध्ये डाव सावरला. न्यूझीलंडने 20 षटकात 7 गडी गमवून 215 धावा केल्या. तसेच विजयासाठी 216 धावांचं आव्हान दिलं आहे.