IND vs NZ: अभिषेक शर्माच्या षटकारामुळे पहिल्याच षटकात बदलण्याची वेळ, झालं असं की…

भारत आणि न्यूझीलंड टी20 मालिकेतील शेवटचा सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्याच षटकात चेंडू बदलण्याची वेळ आली. अभिषेक शर्माने पहिल्या षटकापासून आक्रमक पवित्रा घेतला होता. पण एक षटकार मारला आणि चेंडू बदलावा लागला.

IND vs NZ: अभिषेक शर्माच्या षटकारामुळे पहिल्याच षटकात बदलण्याची वेळ, झालं असं की...
अभिषेक शर्माच्या षटकारामुळे पहिल्याच षटकात बदलण्याची वेळ, झालं असं की...
Image Credit source: PTI
| Updated on: Jan 31, 2026 | 8:26 PM

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाचवा आणि शेवटचा सामना तिरूवनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा भारताच्या पारड्यात पडला. पण सूर्यकुमार यादवने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून सलामीला अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन उतरले होते. या जोडीने आक्रमक फलंदाजीचं दर्शन घडवलं. विकेट पडली तरी चालेल पण आक्रमक पवित्रा कायम असल्याचं पाहायला मिळालं. या सामन्याच्या पहिल्या षटकातील दोन चेंडू निर्धाव गेले. पण तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माने जोरदार प्रहार केला. त्याने षटकाराने खातं खोललं. पण या फटक्यानंतर पंचांना चेंडू बदलण्याची वेळ आली. जॅकब डफीच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने कवरच्या वरून षटकार मारला. हा फटका पाहताच चाहत्यांनी जल्लोष केला. पण या फटक्यानंतर एक विचित्र प्रकार घडला. पंचांनी चेंडू तपासला. तेव्हा चेंडूचा आकार बदलल्याचं लक्षात आलं.

अभिषेक शर्माने षटकार मारला तेव्हा चेंडू जोरात बाउंड्री लाईनवर असलेल्या क्राँक्रिटवर आदळला. त्यामुळे चेंडूचा आकार बदलला. नियमानुसार चेंडूचा आकार बदलला तर तो बदलणं आवश्यक असतं. पंचांनी लगेच नवा चेंडू मागवला. त्यामुळे काही काळ खेळ थांबला होता. त्यानंतर खेळ पुन्हा सुरु झाला. उर्वरित तीन चेंडूत अभिषेक शर्माने दोन चौकार मारले. या षटकात भारताच्या आणि अभिषेक शर्माच्या खात्यात 14 गुण आले. अभिषेक शर्माने आक्रमक सुरूवात केली. मात्र मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरला. त्याने 16 चेंडूत 30 धावा केल्या. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 187.50 होता. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटार मारले.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्मा आक्रमक अंदाज कायम असल्याचं दाखवून दिलं आहे. यात त्याने भारतीय क्रीडाप्रेमींना जराही निराश केलं नाही. पाच पैकी दोन डावात फेल गेला. पण 14 चेंडूत अर्धशतक पाहायला मिळालं. त्यामुळे त्याला कमी आखणं प्रतिस्पर्धी संघांना महागात पडू शकते. अभिषेक शर्माने पाच डावात फलंदाजी करताना 45.50 च्या सरासरीने 182 धावांची खेळी केली. यात त्याने 15 षटचकार मारले. तसेच त्याचा स्ट्राईक रेट हा 249.32 चा होता. आता टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.