
यजमान न्यूझीलंडने भारतीय संघाचा 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत धुव्वा उडवला. न्यूझीलंडने 18 जानेवारीला तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात भारतावर मात केली. न्यूझीलंडने इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये भारताला 41 धावांनी पराभूत करत सलग दुसरा एकदिवसीय सामना जिंकला. न्यूझीलंडने यासह 3 सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने आपल्या नावावर केली. न्यूझीलंडने यासह अनेक दशकांची प्रतिक्षा संपवत इतिहास घडवला. न्यूझीलंडने भारतात एकदिवसीय जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली. तर शुबमन गिल कर्णधार म्हणून मायदेशतील पहिल्याच एकदिवसीय मालिकेत अपयशी ठरला.
त्यानंतर आता भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20i सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेचं आयोजन 21 ते 31 जानेवारी दरम्यान करण्यात आलं आहे. दोन्ही संघांची ही टी 20i वर्ल्ड कपआधी शेवटची मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी ही मालिका फार महत्त्वाची आहे. मात्र भारताचा या मालिकेत चांगलाच कस लागणा आहे. न्यूझीलंडने भारताला एकदिवसीय मालिकेत पराभूत केल्याने त्यांचा विश्वास दुणावलेला आहे. तर भारतासमोर वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या मालिकेत चांगली कामगिरी करण्याचं आव्हान आहे. अशात चाहत्यांना या मालिकेत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने मालिकेतील सामन्यांना किती वाजता सुरुवात होणार? हे जाणून घेऊयात.
पहिला सामना, 21 फेब्रुवारी, नागपूर
दुसरा सामना, 23 फेब्रुवारी, रायपूर
तिसरा सामना, 25 फेब्रुवारी, गुवाहाटी
चौथा सामना, 28 फेब्रुवारी, विशाखापट्टणम
पाचवा सामना, 31 फेब्रुवारी, तिरुवनंतरपूरम
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील सामन्यांना एकाच वेळेस सुरुवात होणार आहे. या सामन्यांना संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील सामने टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येतील. तर जिओहॉटस्टार एपद्वारे मोबाईल-लॅपटॉपवर लाईव्ह मॅचचा थरार अनुभवता येईल.
दरम्यान न्यूझीलंडने भारतात टीम इंडिया विरुद्ध या एकदिवसीय मालिकेआधी 2024 च्या दौऱ्यात कसोटी मालिकाही जिंकली होती. तेव्हा न्यूझीलंडने भारताचा 3-0 ने धुव्वा उडवला होता. त्यामुळे आता न्यूझीलंडचा भारताला भारतात कसोटी, वनडेनंतर टी 20i मालिकेत पराभूत करण्याचा प्रयत्न असणार आहे.