
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand T20i Series 2026) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेतील 4 सामने खेळवण्यात आले आहेत. या 4 पैकी 3 सामने टीम इंडियाने जिंकले आहेत. तर न्यूझीलंडने 1 सामना जिंकला आहे. भारताने सलग 3 सामने जिंकले. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला विशाखापट्टणममध्ये रोखून विजयाचं खातं उघडलं. मात्र त्यानंतरही टीम इंडिया या मालिकेत 3-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. आता उभयसंघात पाचव्या आणि अंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे. हा अंतिम सामना कधी आणि कुठे होणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पाचवा टी 20i सामना शनिवारी 31 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पाचवा टी 20i सामना ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम, तिरुवनंतरपुरममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पाचव्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पाचवा टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड पाचवा टी 20i सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.
दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत तिरुवनंतपुरममधील या मैदानात एकूण 4 टी 20i सामने खेळले आहेत. टीम इंडियाने त्यापैकी 3 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर भारत एक सामना जिंकण्यात अपयशी ठरला आहे. भारताने या मैदानात अखेरचा टी 20i सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करत 235 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला प्रत्युत्तरात 9 विकेट्स गमावून 191 धावांपर्यंतच मजल मारता आली होती. अशात आता टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात या मालिकेतील शेवटचा सामना जिंकणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.