AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : वनडे क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक ठोकल्यानंतर विराट-अनुष्काने केलं असं काही

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत जबरदस्त कामगिरी केली आहे. हाच कित्ता आता उपांत्य फेरीतही गिरवला आहे. न्यूझीलंडसमोर विजयासाठी 397 धावांचं आव्हान दिलं आहे. त्यामुळे गोलंदाजांवरचा प्रेशर कमी झालं आहे. तसेच आता न्यूझीलंडला रोखण्याचं आव्हान गोलंदाजांसमोर आहे. पण या सामन्यात चर्चा झाली ती विराट कोहलीच्या शतकाची

Video : वनडे क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक ठोकल्यानंतर विराट-अनुष्काने केलं असं काही
वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा, शतकी खेळी करताच अनुष्काने असा व्यक्त केला आनंद
| Updated on: Nov 15, 2023 | 6:37 PM
Share

मुंबई : टीम इंडियासाठी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा एकदम खास ठरली आहे. साखळी फेरीतील 9 पैकी 9 सामने जिंकत टीम इंडियाने उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होत आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 50 षटकात 4 गडी गमवून 397 धावा केल्या. तसेच विजयासाठी 398 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात विराट कोहली याने 113 चेंडूत 117 धावांची खेळी केली. यात 9 चौकार आणि 2 षटकार मारले. विराट कोहलीच्या क्रिकेट कारकिर्दितील हे शतक खास आहे. कारण विराट कोहलीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक ठोकलं आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दित 463 वनडे सामने खेळले आहेत. त्यात 452 डावात 44.83 च्या सरासरीने 18426 धावा केल्या. यात एकूण 49 शतकं ठोकली आहेत. दुसरीकडे, विराट कोहली याने 279 वनडे डावात ही उंची गाठली आहे. शतकांचं अर्धशतक झळकावताच त्याने मैदानात आनंद साजरा केला. शतक झळकावल्यानंतर स्टँडमध्ये बसलेल्या सचिन तेंडुलकरला दोन्ही हात वरून कमरेतून वाकून नमस्कार केला.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

सचिन तेंडुलकरला नमन केल्यानंतर पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिला फ्लाइंग किस केलं. इतकंच काय तर अनुष्काने तशीच प्रतिक्रिया दिली. विराट कोहलीची ही रिएक्शन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली याने 279 डावात 50 शतक, सचिन तेंडुलकरने 452 डावात 49 शतकं, रोहित शर्माने 251 डावात 31 शतकं, रिकी पॉन्टिंगने 365 डावात 30 शतकं, सनथ जयसूर्याने 433 डावात 28 शतकं ठोकली आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.