IND vs PAK : पहिल्याच षटकात रोहित शर्मा शाहीन आफ्रिदीच्या रडारवर, झालं असं की…
टी20 वर्ल्डकप स्पर्धेती महत्त्वाचा सामना भारत पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात दोन्ही संघ तूल्यबळ आहेत. पण पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्यात वारंवार व्यत्यय येत आहे. अशात रोहित शर्माची विकेट शेवटच्या चेंडूवर वाचली. 2021 मध्ये केलेली चूक काही अंशी सुधारल्याचं दिसून आलं.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 2021 वर्ल्डकप स्पर्धेत बाबर आझमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा सामना पाकिस्तानने 10 विकेट राखून जिंकला होता. त्यामुळे या सामन्यातही त्याची पुनरावृत्ती होईल अशी काही क्रिकेट तज्ज्ञांचं म्हणणं होतं. कारण रोहित शर्मा डावखुऱ्या गोलंदाजांना खेळताना अडखळतो याची अनुभूती आली आहे. काही अंशी तीच स्थिती पुन्हा एकदा होईल अशी शक्यता होती. मात्र टी20 वर्ल्डकप 2021 च्या तुलनेच रोहित शर्माच्या बॅटिंग शैलीत काही अंशी फरक पडल्याचं दिसून आलं आहे. रोहित शर्मा आक्रमकपणे आणि बिंधास्त खेळत असल्याचं दिसत आहे. तिसऱ्या चेंडूवर षटकार मारून आपला अंदाज दाखवून दिला.
वर्ल्डकप 2021 स्पर्धेत शाहीन आफ्रिदी पहिलं षटक टाकण्यासाठी आला होता. तेव्हा रोहित शर्माला आपलं खातंही खोलता आलं नाही. शाहीन आफ्रिदी पहिलं षटक टाकत होता. चौथा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर खातंही न खोलता बाद झाला. शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला होता. त्यामुळे या सामन्यातही रोहित शर्माच्या चाहत्यांना तीच धास्ती होती. मात्र यावेळी रोहित शर्माचा आक्रमक अंदाज पाहायला मिळाला.
Watch the slap of Captain Rohit Sharma to Shaheen Afridi 🤤❤#INDvsPAK | #RohitSharmapic.twitter.com/tdVxIpDbjE
— Immy|| 🇮🇳 (@TotallyImro45) June 9, 2024
शाहीन आफ्रिदीच्या पहिल्याच चेंडूवर रोहित शर्माने दोन धावा घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या चेंडू निर्धाव गेला. मात्र तिसऱ्या चेंडूवर उत्तुंग षटकार ठोकला आणि आपला आक्रमक अंदाज दाखवून दिला. चौथा आणि पाचवा चेंडूवर धाव घेण्यास रोहित शर्माला अपयश आलं. मात्र सहाव्या चेंडूवर रोहित शर्माच्या चाहत्यांची धाकधूक वाढली. कारण 2021 प्रमाणेच रोहित शर्माची चूक दिसून आली. पण यावेळी चेंडू स्टंपच्या बाहेर जात असल्याचं विकेटकीपर मोहम्मद रिझवानने सांगितलं आणि बाबरने रिव्ह्यू घेतला नाही. त्यामुळे रोहितच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. पण पुन्हा एकदा पावसाचा व्यत्यय आला आणि सामना थांबवावा लागला. पण शाहीन आफ्रिदीने दुसऱ्या षटकात रोहित शर्माला बरोबर अडकवला आणि तंबूत पाठवला.
दोन्ही संघांची प्लेइंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): मोहम्मद रिझवान, बाबर आझम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह, मोहम्मद अमीर.
