AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK Asia Cup 2022: ‘त्या’ तीन शक्तीस्थळांवर हल्ला केल्यास, पाकिस्तानचा खेळ खल्लास

IND vs PAK Asia Cup 2022: आशिया कप (Asia cup) मध्ये आज भारत-पाकिस्तान (IND vs PAK) आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील.

IND vs PAK Asia Cup 2022: 'त्या' तीन शक्तीस्थळांवर हल्ला केल्यास, पाकिस्तानचा खेळ खल्लास
ind vs pakImage Credit source: twitter
| Updated on: Aug 28, 2022 | 3:00 PM
Share

मुंबई: आशिया कप (Asia cup) मध्ये आज भारत-पाकिस्तान (IND vs PAK) आमने-सामने येणार आहेत. दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील. सामना दुबईत असल्याने आपल्याला जास्त Advantage असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. पण आशिया कपचा रेकॉर्ड भारताच्या बाजूने आहे. पाकिस्तानच्या विद्यमान संघात क्षमता आहे. पण ही क्षमताच त्यांची सर्वात मोठी कमजोरी सुद्धा आहे. पाकिस्तानला धूळ चारण्यासाठी भारताला त्यांच्या ताकतीवरच हल्लाबोल करावा लागेल.

टॉप 3 फलंदाज ताकत

तुम्ही विचार करत असाल, पाकिस्तानची ताकत काय आहे, जी त्यांची कमजोरी सुद्धा ठरु शकते. पाकिस्तानची ही ताकत त्यांच्या फलंदाजीत आहे. त्यांच्या बॅटिंग ऑर्डरचे टॉप 3 फलंदाज महत्त्वपूर्ण ठरतील. पाकिस्तानी संघ त्यांच्यावर जास्त अवलंबून असेल. भारताने पाकिस्तानच्या टॉप 3 फलंदाजांवर नियंत्रण मिळवल्यास, सामना भारताच्या बाजूने फिरेल. हे असं करणं का आवश्यक आहे, ते समजून घ्या.

  1. वर्ष 2021 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपपासून बाबर, रिजवान आणि फरवर या तिघांनी मिळून 67.5 टक्के धावा केल्या आहेत. या दरम्यान हे तिघेच टी 20 मध्ये 72 टक्के चेंडू खेळलेत. म्हणजे टीम मधील उर्वरित सदस्यांनी 28 टक्के चेंडूंचा सामना केलाय. भारतीय गोलंदाजांनी या तिघांना झटपट पॅव्हेलियन मध्ये पाठवल्यास भारताचं काम अधिक सोपं होईल.
  2. पाकिस्तानची ताकत त्यांचे टॉप 3 फलंदाज आहेत, ज्यांनी टी 20 वर्ल्ड कप 2021 पासून जास्तीत जास्त धावा केल्या आहेत. मधल्याफळीतील फलंदाजांपैकी कोणीही 200 धावा केलेल्या नाहीत. त्यामुळे पाकिस्तानची टॉप ऑर्डर कोसळल्यास भारताचा पुढचा मार्ग सोपा होईल.
  3. पाकिस्तानला ज्या टॉप ऑर्डरवर अभिमान आहे, त्याने जानेवारी 2020 पासून आतापर्यंत जास्त आक्रमक फलंदाजी केलेली नाही. बाबर आजमने या दरम्यान पावरप्ले मध्ये प्रति षटक 6.72 च्या सरासरीने धावा केल्यात. रिजवानने प्रति ओव्हर 7.20 आणि फरवरने प्रति ओव्हर 7.80 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. हे तिघे पाकिस्तानचं मुख्य शक्तीस्थळ आहेत.

अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.