IND vs PAK Playing XI: टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यासाठी प्लेईंग ईलेव्हनमध्ये मोठा बदल, या खेळाडूला डच्चू
ICC T20 World Cup India vs Pakistan Playing XI: टीम इंडिया-पाकिस्तान दोन्ही संघ या आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेनिमित्ताने पहिल्यांदा न्यूयॉर्कमध्ये खेळत आहेत.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 19 व्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने आहेत. दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. सामन्याला रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 8 वाजता टॉस झाला. पाकिस्तानने टॉस जिंकला. कॅप्टन बाबर आझम याने फिल्डिंगचा निर्णय घेत टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. या महामुकाबल्यात प्लेईंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळाली आहे? हे आपण जाणून घेऊयात.
प्लेईंग ईलेव्हनमध्ये 1 बदल
टीम इंडियाने प्लेईंग ईलेव्हनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. कॅप्टन रोहित शर्मा याने आपल्या त्याच प्लेईंग ईलेव्हनवर विश्वास दाखवत कोणताही बदल केलेला नाही. याच प्लेईंग ईलेव्हनने आयर्लंड विरुद्ध विजय मिळवला होता. तर पाकिस्तानने या सामन्यासाठी एकमेव बदल केला आहे. आझम खान याला विश्रांती देण्यात आली आहे. तर त्याच्या जागी इमाद वसीम याला संधी देण्यात आली आहे.
टीम इंडियाची टी 20 वर्ल्ड कप इतिहासातील कामगिरी
टीम इंडियाने आतापर्यंत आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत एकूण 45 सामने खेळले आहेत. टीम इंडियाने 45 पैकी 29 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 15 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. तर 1 सामना हा बरोबरीत राहिला, जो टीम इंडियाने जिंकला होता. टीम इंडियाची विजयी टक्केवारी ही 66 टक्के राहिली आहे.
पाकिस्तानकडून 1 बदल, टीम इंडिया अनचेंज
🚨 TOSS & PLAYING XI 🚨
Pakistan win the toss and opt to field first 🏏
One change for the team today 🇵🇰#INDvPAK | #T20WorldCup | #WeHaveWeWill pic.twitter.com/Cf0ZHykn87
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 9, 2024
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.
