
टीम इंडियाने आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. टीम इंडियाने बुलावायो स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवत सेमी फायनलमध्ये धडक दिली. भारताची या स्पर्धेत सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग सहावी वेळ ठरली. भारताने पाकिस्तानसमोर 253 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी नेट रनरेटच्या हिशोबाने हे आव्हान 33.3 ओव्हरमध्ये पूर्ण करायचं होतं. मात्र पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंजदाजांसमोर गुडघे टेकले. भारताने पाकिस्तानला 22 बॉलआधीच गुंडाळलं. भारताने पाकिस्तानला 46.2 ओव्हरमध्ये 194 रन्सवर ऑलआऊट केलं. भारताने अशाप्रकारे विजय मिळवला. भारताचा हा या स्पर्धेतील एकूण आणि सलग पाचवा विजय ठरला.
पाकिस्तानने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. कर्णधार आयुष म्हात्रे याचा अपवाद वगळता भारताच्या 8 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. या 8 फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र वेदांत त्रिवेदी याच्यापैकी एकाही फलंदाजाला त्या खेळीला अर्धशतकात बदलता आलं नाही. वेदांतने भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या. वेदांतने 98 बॉलमध्ये 2 फोर आणि 1 सिक्ससह 68 रन्स केल्या. कनिष्क चौहान याने निर्णायक 35 धावा जोडल्या. तर ओपनर वैभव सूर्यवंशी याने 30 धावांचं योगदान दिलं.
आर एस अंब्रिश याने 29 धावा केल्या. तर खिलान पटेल आणि विहान मल्होत्रा या दोघांनी प्रत्येकी 21-21 धावांचं योगदान दिलं. या व्यतिरिक्त एकालाही 20 या आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. पाकिस्तानसाठी अब्दुल सुभान याने 3 तर मोहम्मद सय्याम याने 2 विकेट्स मिळवल्या.
पाकिस्तानला उपांत्य फेरीसाठी नेट रन रेटनुसार 33.3 ओव्हरमध्ये 253 धावा करायच्या होत्या. मात्र पाकिस्तानच्या बॅटिंगमध्ये नेट रनरेटच्या हिशोबाने दम दिसला नाही. त्यामुळे पाकिस्तान उपांत्य फेरीत पोहचणार नसल्याचं निकालाआधीच स्पष्ट झालं.
भारताची उपांत्य फेरीत धडक
Unbeaten and into the final four! 👏🔝
India U19 enter the ICC Under-19 Men’s Cricket World Cup 2026 semi-finals, where they will face Afghanistan U19 🙌
Scorecard ▶️ https://t.co/9EQew1omYY #U19WorldCup pic.twitter.com/EfggoIHkeA
— BCCI (@BCCI) February 1, 2026
पाकिस्तानसाठी उस्मान खान याने सर्वात जास्त 66 धावा केल्या. ओपनर हमझा झहूर याने 42 धावा जोडल्या. कॅप्टन फरहान यूसुफ याने 38 तर हुझेफा अहसान याने 14 धावांचं योगदान दिलं. त्याव्यतिरिक्त एकालाही दुहेरी आकड्यापर्यंत पोहचता आलं नाही. भारतासाठी कर्णधार आयुष म्हात्रे आणि खिलान पटेल या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. तर कनिष्क चौहान, विहान मल्होत्रा, आरएस अंब्रिश आणि हेनिल पटेल या चौघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.