IND vs PAK : इरफान पठाणने आफ्रिदीची नाव न घेता लाज काढली! काय म्हणाला?
Irfan Pathan vs Shahid Afridi: टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याने डिवचल्यानंतर शाहिद आफ्रिदी याला चांगलंच सुनावलंय. नक्की प्रकरण काय? जाणून घ्या.

आशिया कप 2025 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमनेसामने असणार आहेत. टीम इंडियाने पाकिस्तानवर गेल्या रविवारी 14 सप्टेंबरला पराभूत केलं. भारताने साखळी फेरीतील सामन्यानत पाकिस्तानवर 7 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर आता दोन्ही संघात सुपर 4 फेरीत टक्कर पाहायला मिळणार आहे. भारत आशिया कप 2025 स्पर्धेतील एकमेव अजिंक्य संघ आहे. भारताने साखळी फेरीत खेळलेले तिन्ही सामने जिंकले आहेत. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानला पुन्हा पराभूत करत सलग चौथा विजय मिळवण्यासाठी सज्ज झाली आहे.
भारत-पाकिस्तान सामन्याची चाहत्यांना कायमच प्रतिक्षा असते. दोन्ही संघातील सामन्यात ऑन फिल्ड चढाओढ असते. तशीच ऑफ फिल्डही दोन्ही देशांचे चाहते आणि माजी खेळाडू एकमेंकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. यात काही चुकीचं नाही. मात्र कायमच पातळी सोडून बोलणाऱ्या आणि भारताबाबत गरळ ओकणाऱ्या शाहिन आफ्रिदी याने पुन्हा एकदा आपल्या अकलेचे तारे तोडले आहेत. आफ्रिदीने भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण याला डिवचलं. मात्र इरफाणने आफ्रिदीला सौम्य पण तितक्याच जळजळीत शब्दात उत्तर दिलंय. इरफानने एक्स पोस्टद्वारे नाव न घेता आफ्रिदीला सुनावलं आहे. आफ्रिदी नक्की काय बोलला आणि इरफानने त्याला काय प्रत्युत्तर दिलंय, हे जाणून घेऊयात.
आफ्रिदी काय म्हणाला होता?
Shahid Afridi accused @IrfanPathan of telling lies and challenged him to a face-to-face discussion. Afridi also claimed Pathan is attempting to prove his loyalty to India while opposing Pakistan.
Who is gonna tell @SAfridiOfficial that Pathan doesn’t need to prove anything, as… pic.twitter.com/3ViPYMve43
— Slogger (@kirikraja) September 19, 2025
“मी त्याला मर्द समजतो जो जो समोरासमोर बोलतो. फेस टु फेस बोलावं, डोळ्यात डोळे घालून बोलावं. मग पाठी मागे जे हवं आणि वाटेल ते बोलावं. इरफान पठाण आयुष्यभर तो सर्वात मोठा हिंदुस्तानी आहे हे सिद्ध करत राहिल”, असं आफ्रिदीने पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर म्हणत इरफानला डिवचलं. यावर इरफानने नाव न घेता आफ्रिदीला सुनावलं.
इरफान पठाणचं चोख उत्तर
Aap Log sahi kehte hain: ‘Ye padosi X players aur media Irfan Pathan ke naam se obsessed hain.’
— Irfan Pathan (@IrfanPathan) September 20, 2025
शाहिदीने दिलेल्या आव्हानाला इरफानने सोशल मीडिया पोस्टद्वारे उत्तर दिलंय. इरफानने शाहिदीला नाव न घेता सुनावलंय. “तुम्ही बरोबर बोलता, हे शेजारी माजी क्रिकेटपटू आणि माध्यमं इरफान पठाणबाबत फार ओबेस्ड आहेत”, असं इरफानने एक्स पोस्टमध्ये म्हटलंय.
