Ind Vs Sa 2nd T20 : भुनवनेश्वर कुमारने आफ्रिकेच्या टीमचं कंबरडं मोडलं, 3 ओव्हरमध्ये 3 विकेट

टीम इंडियाला जरी मोठा स्कोर उभा करता आला नसला तरी भारतीय गोलंदाजीला हा स्कोर रोखण्यास खूप मोठं आव्हन नसणरा आहे. कारण भुवनेश्वरने चांगली गोलंदाजी करत भारतीय संघाला तुर्तास दिलासा दिला आहे.

Ind Vs Sa 2nd T20 : भुनवनेश्वर कुमारने आफ्रिकेच्या टीमचं कंबरडं मोडलं, 3 ओव्हरमध्ये 3 विकेट
भुनवनेश्वर कुमारImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 9:28 PM

कटक : आज टीम इंडिया (Ind Vs Sa) दुसरा टी- सामना (2nd T20) जिंकण्यासाठी साऊथ आफ्रिकेला (Indian Cricket Team) भिडली आहे. जशी टीम इंडियाची फलंदाजीची सुरूवात खराब झाली होती. तशीच साऊथ आफ्रिकेचीही खराब सुरूवात भुवनेश्वर कुमाच्या भेदक माऱ्यामुळे झाली आहे. सुरूवातीच्या षटकात भुवनेश्वरने 3 विकेट काढत मॅचमध्ये पुन्हा रंगत आणली आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना कटक येथील बाराबती स्टेडियमवर खेळवला जात आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. भारतीय कर्णधार ऋषभ पंतने सलग दुसऱ्यांदा नाणेफेक गमावली आणि संघाला आधी बॅटिंग करावी लागली. टीम इंडियाला जरी मोठा स्कोर उभा करता आला नसला तरी भारतीय गोलंदाजीला हा स्कोर रोखण्यास खूप मोठं आव्हन नसणरा आहे. कारण भुवनेश्वरने चांगली गोलंदाजी करत भारतीय संघाला तुर्तास दिलासा दिला आहे.

भुवनेश्वरची जबरदस्त गोलंदाजी

बीसीआयचं ट्विट

तीन ओव्हरमध्ये तीन विकेट

वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच षटकात भारताला विकेट मिळवून दिली. ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर त्याने रीझा हेड्रिक्सला बोल्ड केले. हेंड्रिक्सने 3 चेंडू खेळले आणि 1 चौकाराच्या मदतीने 4 धावा केल्या. हीच घोडदौड कायम ठेवत भुवनेश्वर कुमारनेही त्याच्या दुसऱ्या षटकात जोरदार झटका दिला. त्याने षटकाच्या 5व्या चेंडूवर ड्वेन प्रिटोरियसला आवेश खानच्या हाती कॅच आऊट केले. प्रिटोरियसने 5 चेंडूत 1 चौकाराच्या मदतीने 4 धावा केल्या. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने त्याच्या तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रसी व्हॅन डर डुसेनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. डसेनने 7 चेंडूत 1 धावा काढल्या. त्यानंतर हेनरिक क्लासेन फलंदाजीला आला.

भारताने किती धावांचं टार्गेट दिलं?

भारतीय संघाने 20 षटकात 6 विकेट गमावून 148 धावा केल्या असून दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 149 धावांचे लक्ष्य दिले आहे. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक 40 धावा केल्या. त्याने 35 चेंडूंच्या खेळीत 2 चौकार आणि तब्बल षटकार मारले. त्याच्याशिवाय इशान किशनने 21 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकारांसह 34 धावांची शानदार खेळी खेळली. आता आफ्रिकेसाठी हेही आव्हान जड झालं आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.