AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SA vs IND 2nd T20 | सूर्यकुमार यादवने या स्टार खेळाडूला बाहेर बसवत केली चूक, गमवावा लागला सामना

SA vs IND 2nd T20 : टीम इंडियाला आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात सूर्याने फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूला संधी दिली नाही. याचाच फटका संघाला बसल्याची चर्चा होत आहे. कोण आहे ते खेळाडू जाणून घ्या.

SA vs IND 2nd T20 | सूर्यकुमार यादवने या स्टार खेळाडूला बाहेर बसवत केली चूक, गमवावा लागला सामना
| Updated on: Dec 13, 2023 | 10:35 AM
Share

मुंबई : टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमध्ये झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात आफ्रिकेने 5 विकेटने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दमदार फलंदाजी केली होती मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना कमी ओव्हरचा करण्यात आला होता. टीम इंडिया 19.3 ओव्हरमध्ये 180 धावा केल्या होत्या. मात्र डकवर्थ लुईस नियमानुसार 15 ओव्हरमध्ये 152 धावांचं लक्ष्य देण्यात आलं होतं. आफ्रिकेच्या फलंदाजांनी तोडफोड बॅटींग करत 14 व्या ओव्हरमध्येच हे आव्हान पूर्ण केलं. सूर्याने आजच्या प्लेइंग 11 मध्ये एका स्टार खेळाडूला खेळवलं नाही. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

कोण आहे तो खेळाडू?

हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून ऋतुराज गायकवाड आहे. ऋतुराज गायकवाड याने  ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेमध्ये त्याने दमदार कामदगिरी केली होती. सुरूवातील स्लो सुरूवात केल्यावर गडी एकदा सेट झाला की नंतर विरोधी संघाच्या गोलंदाजांना धुवायचा. या सामन्यात ऋतुराजला प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात न आल्याने चाहतेही नाराज आले होते. मंगळवारी झालेल्या सामन्यात शुबमन गिल याला संधी देण्यात आली होती. मात्र त्याला भोपळाही फोडता आला नाही.

टीम इंडियाची सुरूवात एकदम खराब झाली होती. मार्का यान्सेन याच्या पहिल्या ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वाल माघारी परतला. त्याच ओव्हरमध्ये तिलक वर्मासुद्ध आऊट झाला असता. मात्र त्याला जीवदान मिळाल्यामुळे तो वाचला. शुबमन गिल शून्यावर आऊट झाला, रिंकू सिंह याने जबरदस्त अर्धशतक ठोकत नाबाद 68 धावा केल्या होत्या. यामध्ये त्याने दोन षटकार आणि नऊ चौकार मारले.  त्यासोबतच सूर्युकमार यादव यानेही 56 धावा करताना तीन षटकार आणि पाच चौकार मारले.

दरम्यान, टीम इंडियाने दुसरा टी-20 सामना गमावला असून आता तिसरा सामन्यात विजय मिळवावाच लागणार आहे. नाहीतर टी-20 मालिका आफ्रिका आपल्या खिशात घालेल. सूर्यकुमार यादव तिसऱ्या सामन्यात काही बदल करत ऋतुराजला संधी देतो की की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह आणि मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका प्लेईंग ईलेव्हन | एडेन मारक्रम (कॅप्टन), मॅथ्यू ब्रीट्जके, रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जानसेन, एंडिले फेहलुकवायो, गेराल्ड कोएत्जी, लिजाद विलियम्स आणि तबरेज शम्सी.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.