IND VS SA: ऋषभ पंतच्या कॅचवरुन वाद, दक्षिण आफ्रिकेने थर्ड अंपायरकडे दाद मागितली, पण…

IND VS SA: ऋषभ पंतच्या कॅचवरुन वाद, दक्षिण आफ्रिकेने थर्ड अंपायरकडे दाद मागितली, पण...

45 व्य़ा षटकाच्या चौथ्या चेंडूवर शार्दुलच्या गोलंदाजीवर आत येणार चेंडू रेसी वान डर डुसाच्या बॅटची कड घेऊन थायपॅडला लागला. त्यानंतर चेंडू पंतच्या ग्लोव्हजमध्ये विसावला

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 04, 2022 | 5:59 PM

जोहान्सबर्ग: क्रिकेटमध्ये कुठल्याही फलंदाजाला चुकीच्या पद्धतीने बाद दिले जाऊ नये, यासाठी टेक्नोलॉजी उपलब्ध आहे. पण तरीही एखाद्या विकेटवरुन वाद होतो. आज जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्यादिवशी रेसी वान डर डुसेंची विकेट वादग्रस्त ठरली. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर रेसी वान डर डुसाची कॅच ऋषभ पंतने (Rishabh pant) घेतली. पंचाने त्याला आऊट दिले. पण रिप्लेमध्ये रेसी वान डर डुसा नॉटआऊट असल्याचं दिसत होतं. (IND VS SA 2nd test rishabh pant controversial catch rassie van der dussen dean elgar appeals third umpire)

45 व्य़ा षटकाच्या चौथ्या चेंडूवर शार्दुलच्या गोलंदाजीवर आत येणार चेंडू रेसी वान डर डुसाच्या बॅटची कड घेऊन थायपॅडला लागला. त्यानंतर चेंडू पंतच्या ग्लोव्हजमध्ये विसावला. पंच इरास्मस यांनी दुसांला आऊट दिले. पण रिप्लेमध्ये चेंडूने ग्लोव्हजमध्ये विसावण्याआधी जमिनीला स्पर्श केल्याचे दिसले. कॉमेंट्री करणाऱ्यांनाही दुसा नॉटआऊट असल्याचे वाटले.

फुटेज पाहिल्यानंतर तिसरे पंच म्हणाले…
दक्षिण आफ्रिकन संघानेही हा व्हिडीओ पाहिला. त्यानंतर कर्णधार डीन एल्गर आणि टीम मॅनेजर तिसऱ्या पंचाकडे गेले. डुसाला चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्याची तक्रार त्यांनी केली. यजमान संघाच्या अपीलनंतर तिसऱ्या पंचांनी डुसाच्या विकेटचे फुटेज पाहिले. चेंडूने ग्लोव्हजमध्ये जाण्याआधी जमिनीला स्पर्श केला आहे, असे वाटत नाही, असे तिसऱ्या पंचांनी सांगितले. त्यामुळे डुसाच्या विकेटवर भारतीय कर्णधारबरोबर बोलता येणार नाही, असे त्यांनी सांगितले.

…तर रेसी वान डर डुसा मैदानात येऊ शकला असता
रेसी वान डर डुसा नॉटआऊट आहे, असे तिसऱ्या पंचांना वाटले असते, तर राहुलला बादचे अपील मागे घ्यायला सांगितले असते. राहुल तयार झाला असता, तर रासी वॅन डार डुसा पुन्हा फलंदाजीला मैदानात येऊ शकला असता.

संबंधित बातम्या:

एक संपला नाही, की आला दुसरा! फ्रान्समध्ये आढळला ओमिक्रॉनपेक्षाही जास्त संसर्गजन्य कोरोना वेरीएंट
मुंबईत 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ, काँग्रेस म्हणते, निर्णय चांगला, पण…
मुंबईपाठोपाठ आता पुण्यातील 1ली ते 9वी पर्यंतचा शाळा उद्यापासून बंद, नवी नियमावली काय?

(IND VS SA 2nd test rishabh pant controversial catch rassie van der dussen dean elgar appeals third umpire)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें