
IND vs SA : भारताने कोलकाता कसोटी सामना हातातून गमावला. आता गुवाहाटी कसोटीतही पराभवाची नामुष्की ओढावली आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेत क्लिन स्विप मिळणार हे जवळपास निश्चित झालं आहे. कारण पहिल्या डावात दक्षिण अफ्रिकेने 489 धावा केल्या आणि भारताचा डावा 201 धावांवर आटोपला. त्यामुळे दक्षिण अफ्रिकेकडे 288 धावांची आघाडी आहे. खरं तर 200 धावांचा पुढे आघाडी असेल तर फॉलोऑन दिला जातो. पण असं असूनही टेम्बा बावुमाने तसं केलं नाही. त्यामुळे त्याच्या निर्णयाची चर्चा होत आहे. दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने फॉलोऑन न देण्याचा निर्णय मैदानाबाहेर जाऊन केला. टीम इंडिया सर्वबाद झाल्यानंतर पंचांनी टेम्बा बावुमाला फॉलोऑनबाबत विचारलं. तेव्हा त्याने दोन मिनिटांचा वेळ मागितला आणि धावत मैदानाबाहेर गेला.
टेम्बा बावुमा खरं तर संभ्रमात होता, त्यामुळे फॉलोऑनबाबतचा निर्णय विचारण्यासाठी तो धावत टीम मॅनेजमेंटकडे गेला. यासाठी त्याने पंचांकडे दोन मिनिटांचा वेळ मागितला. वेळ मिळाताच थेट ड्रेसिंग रूममध्ये धावत गेला आणि पुन्हा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मैदानाच्या बाहेरूनच त्याने पंचांना आपल्या फलंदाजीचा निर्णय कळवला. बावुमाने मैदानाबाहेरूनच पंचांना माहिती दिली की, पिचवर हलका रोलर हवा आहे. , दोन दिवसांच्या खेळात खेळपट्टीवर यामुळे आणखी भेगा पडतील अशी रणनिती आहे. कारण दुसऱ्या डावात भारतीय संघ मैदानात फलंदाजीला उतरणार आहे. त्यामुळे दक्षिण अफ्रिकन गोलंदाजांना मदत होईल.
मार्को यानसेनच्या भेदक माऱ्यापुढे भारतीय संघाची दाणादाण उडाली. त्याने फक्त 48 धावा देते 6 गडी बाद केले. जानसेनने ध्रुव जुरेल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांना बाद करून मधली फळी उद्ध्वस्त केली. इतकंच काय तर हार्मरने 3 आणि केशव महाराजने एक बळी घेतला. तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण अफ्रिकेने बिनबाद 26 धावा केल्या आहे. दक्षिण अफ्रिकेकडे मजबूत 314 धावांची आघाडी आहे.