
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या टी 20i सामन्याचं आयोजन हे धर्मशालेतील एचपीसीए क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. उभयसंघातील 5 सामन्यांची टी 20i मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी तिसरा सामना हा महत्त्वाचा आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव याने फिल्डिंगचा निर्णय घेत दक्षिण आफ्रिकेला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. तिसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघांकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 5 बदल करण्यात आले आहेत.
पहिल्या 2 सामन्यात अपयशी ठरलेल्या शुबमन गिल याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली जाणार की नाही? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र शुबमनवर टीम मॅनेजमेंटने पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. शुबमनला संधी दिली आहे. अर्थात संजू सॅमसन याला पुन्हा डच्चू मिळाला आहे. तर टीम इंडियात 2 अनपेक्षित बदल करण्यात आले आहेत. मात्र हे बदल नाईलाजाने करावे लागले आहेत.
जसप्रीत बुमराह याने वैयक्तिक कारणामुळे तिसऱ्या सामन्यातून माघार घेतली आहे. तर फिरकीपटू अक्षर पटेल याची तब्येत बरी नसल्याने त्याला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह या दोघांच्या जागी कुलदीप यादव आणि हर्षित राणा यांचा समावेश करण्यात आला आहे.
तर दुसर्या बाजूला दक्षिण आफ्रिकेने प्लेइंग ईलेव्हनमधून तिघांना डच्चू देण्यात आला आहे. डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे आणि लुथो सिपामला या तिघांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर यांच्या जागी कॉर्बिन बॉश, एनरिख नॉर्खिया आणि ट्रिस्टन स्टब्स यांचा समावेश करण्यात आला आहे.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग ईलेव्हन : रीजा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडन मार्रक्रम (कॅप्टन), डेवाल्ड ब्रेव्हीस, ट्रिस्टन स्टब्स, डोनोवन फरेरा, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, एनरिक नॉर्खिया, लुंगी एनगिडी आणि ओटनील बार्टमॅन.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), हर्षित राणा, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती.