AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : द. आफ्रिकेतील पहिल्या कसोटी मालिकाविजयासाठी भारताला केपटाऊनचा इतिहास बदलणे गरजेचे!

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग हा टीम इंडियाचा बालेकिल्ला होता. यजमानांच्या हातून येथे 7 गडी राखून नुकत्याच झालेल्या पराभवापूर्वी भारतीय संघ या मैदानावर एकही सामना हरला नव्हता. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेतील पहिली कसोटी मालिका जिंकणे टीम इंडियासाठी कठीण झाले आहे.

IND vs SA : द. आफ्रिकेतील पहिल्या कसोटी मालिकाविजयासाठी भारताला केपटाऊनचा इतिहास बदलणे गरजेचे!
Team India चे सुधारीत वेळापत्रक जाहीर
| Edited By: | Updated on: Jan 07, 2022 | 11:51 AM
Share

डरबन : दक्षिण आफ्रिकेने जोहान्सबर्गमधील भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतावर रोमाचंक विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने हा सामना सात विकेटने जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयाचा नायक ठरला, त्यांचा कर्णधार डीन एल्गर. त्याने नाबाद (96) धावांची खेळी केली. आतापर्यंतच्या तीन डावांमध्ये भारतीय गोलंदाज प्रभावी ठरले होते. पण चौथ्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी आपली कामगिरी उंचावली व भारतीय गोलंदाजांना अजितबात दाद दिली नाही. या विजयाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात हा संघ आत्मविश्वासाने मैदानात उतरेल यात शंका नाही. (IND vs SA 3rd Test : India need to change Cape Town history to win first Test series against South Africa!)

दुसऱ्या बाजूला जोहान्सबर्गमधील पराभवानंतर टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा अधांतरी आहे. दोन्ही संघांमधील 3 कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आली आहे. म्हणजेच आता केप टाऊनमधील तिसरी कसोटी निर्णायक आणि रोमांचक ठरणार आहे. विशेष म्हणजे केप टाऊनच्या मैदानात भारतीय खेळाडूंचा कस लागणार आहे. कारण भारतीय संघाने या मैदानावर कधीही कसोटी सामना जिंकलेला नाही.

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग हा टीम इंडियाचा बालेकिल्ला होता. यजमानांच्या हातून येथे 7 गडी राखून नुकत्याच झालेल्या पराभवापूर्वी भारतीय संघ या मैदानावर एकही सामना हरला नव्हता. या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेतील पहिली कसोटी मालिका जिंकणे टीम इंडियासाठी कठीण झाले आहे. वास्तविक, तिसरी कसोटी केपटाऊनमध्ये आहे, जिथे भारताचा रेकॉर्ड खराब आहे. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या मागील 5 पैकी 3 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. 2 सामने ड्रॉ झाले आहेत. म्हणजेच येथे एकही सामना भारताला जिंकता आलेला नाही. याचाच अर्थ भारताला दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी मालिका विजय मिळवायचा असेल तर टीम इंडियाला केपटाऊनचा इतिहास बदलावा लागणार आहे.

विराट कोहली संघात पुनरागमन करण्याची शक्यता

दरम्यान, केपटाऊनच्या निर्णायक सामन्यासाठी भारताचा नियमित कसोटी कर्णधार विराट कोहलीचेही महत्त्व वाढले आहे, ज्याने दुखापतीमुळे जोहान्सबर्ग कसोटीतून माघार घेतली होती. विराट कोहली कसोटी मालिकेतील अंतिम आणि निर्णायक लढतीत संघात कमबॅक करणार की नाही याबाबात मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठी अपडेट दिली आहे. राहुलने विराट कोहलीची दुखापत आणि त्याच्या फिटनेसबाबत ताजे अपडेट्स दिले.

राहुल द्रविड म्हणाला, “कोहली ज्या प्रकारे नेटमध्ये सराव करत आहे, त्यावरून तो फिट दिसत आहे. मुख्य प्रशिक्षक म्हणाले की, त्यांनी फिजिओशी अद्याप चर्चा केली नसली तरी, तो जे काही ऐकत आहे आणि त्याच्याशी बोलत आहे त्यावरून असे दिसतेय की भारतीय कसोटी कर्णधार फिट आहे. केपटाऊनमध्ये खेळल्या जाणाऱ्या मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत विराट कोहली पुनरागमन करताना दिसेल. हे द्रविडच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. असे झाल्यास हनुमा विहारीला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर व्हावे लागेल.”

इतर बातम्या

IND VS SA: भारताने ‘या’ पाच चुकांमुळे गमावली जोहान्सबर्ग कसोटी

IND VS SA: एल्गरने करुन दाखवलं! दक्षिण आफ्रिकेचा भारतावर शानदार विजय

IND VS SA: जबरदस्त, बुमराह-शामीचे बॉल शेकले पण हार न मानता एल्गरने झळकावलं झुंजार अर्धशतक

(IND vs SA 3rd Test : India need to change Cape Town history to win first Test series against South Africa!)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.