
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता 14 नोव्हेंबरपासून मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हात करणार आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात कसोटी मालिकेत एकूण 2 सामने होणार आहेत. या मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या मालिकेत विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र कोणत्या एकाच संघाचा विजय होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पहिल्याच सामन्यात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उभयसंघातील पहिला कसोटी सामना हा कधी आणि कुठे होणार? याबाबतची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊयात.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना हा 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना कोलकातामधील ईडन गार्डन्समध्ये खेळवण्यात येणार आहे.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.
शुबमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत याचं दुखापतीनंतर कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. पंतकडे उपकर्णधार, विकेटकीपिंग आणि बॅटिंग अशी तिहेरी जबाबदारी आहे. तर टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीअंतर्गंत खेळवण्यात येणार आहे.
टीम इंडिया या साखळीत आतापर्यंत अजिंक्य आहेत. भारताने या साखळीतील 2 पैकी 1 मालिका जिंकली आहे. तर 1 मालिका बरोबरीत सोडवली आहे. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.