IND vs SA : पहिल्या टेस्टमधून ऑलराउंडर बाहेर, बीसीसीआयची मोठी घोषणा, कारण काय?
India vs South Africa Test Series 2025 : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याला अवघे काही तास बाकी असताना बीसीसीआयने भारतीय संघात 1 बदल केला आहे. जाणून घ्या.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर क्रिकेट चाहत्यांना भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेध लागले आहेत. भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i अशा 3 मालिका खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्याची सुरुवात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. हा सामना 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. मात्र सामन्याच्या 2 दिवसआधी बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने टीम इंडियाच्या एका खेळाडूला रिलीज केलं आहे. बीसीसीआयने सोशल मीडियावरुन याबाबतच माहिती दिली आहे.
भारताचा ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातून मुक्त केलं आहे. इंडिया ए विरुद्ध दक्षिण आफ्रिका ए यांच्यात अनऑफीशियल वनडे सीरिजला 13 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. नितीशला या मालिकेतील 3 सामन्यांसाठी संघातून मुक्त करण्यात आलं आहे. तसेच या मालिकेनंतर नितीशचा दुसऱ्या सामन्यासाठी संघात समावेश केला जाईल, असंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. या मालिकेची सांगता 19 नोव्हेंबरला होणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामन्यांचं आयोजन हे राजकोटमधील एकाच ठिकाणी करण्यात आले आहेत.
भारत-दक्षिण आफ्रिका ए टीमच्या वनडे सीरिजचं शेड्यूल
पहिला सामना, 13 नोव्हेंबर, राजकोट
दुसरा सामना, 16 नोव्हेंबर, राजकोट
तिसरा सामना, 19 नोव्हेंबर, राजकोट
ध्रुव जुरेलचा मार्ग मोकळा!
दरम्यान नितीश कुमार रेड्डीला पहिल्या सामन्यासाठी संघातून मुक्त केल्याने विकेटकीपर बॅट्समन ध्रुव जुरेल याचा पहिल्या प्लेइंग ईलेव्हनच्या हिशोबाने मार्ग मोकळा झाला आहे. ऋषभ पंत याचं दुखापतीनंतर संघात कमबॅक झालंय. त्यामुळे पंत विकेटकीपिंग करणार असल्याने ध्रुवला नितीशच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र नितीश पहिल्या कसोटीचा भाग नसल्याने आता ध्रुव जुरेल याला अंतिम 11 खेळाडूंमध्ये संधी मिळणार असल्याचं निश्चित समजलं जात आहे.
नितीश कुमार रेड्डी पहिल्या टेस्टमधून रिलीज
🚨 NEWS 🚨
Nitish Kumar Reddy released from India’s squad for the first Test.
Nitish will join the India A squad for the One-day series against South Africa A in Rajkot and will return to #TeamIndia squad for the second Test post the conclusion of the ‘A’ series.
Details 🔽…
— BCCI (@BCCI) November 12, 2025
पहिल्या कसोटीसाठी भारताचा सुधारित संघ : शुबमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि विकेटकीपर), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडीक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वाशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि आकाश दीप.
