AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : ध्रुव जुरेलची 2 खणखणीत शतकांनंतर पहिल्या टेस्टमध्ये जागा फिक्स! कुणाच्या जागी संधी?

Dhruv Jurel India vs South Africa Test Cricket : टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना हा 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान कोलकातामधील ईडन गार्डन्समध्ये होणार आहे.

IND vs SA : ध्रुव जुरेलची 2 खणखणीत शतकांनंतर पहिल्या टेस्टमध्ये जागा फिक्स! कुणाच्या जागी संधी?
Dhruv Jurel Team India AImage Credit source: PTI
| Updated on: Nov 09, 2025 | 11:33 PM
Share

इंडिया ए टीमला पाहुण्या दक्षिण आफ्रिका ए कडून दुसऱ्या अनऑफीशियल टेस्ट मॅचमध्ये 417 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने चौथ्या डावात विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग करत 2 सामन्यांची मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. भारताला या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. मात्र टीम इंडियाचा युवा फलंदाज ध्रुव जुरेल याने आपली छाप सोडली. ध्रुवने दुसऱ्या सामन्यातील दोन्ही डावांत शतक झळकावलं. तसेच ध्रुवने यासह दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टेस्टसाठी दावा ठोकला आहे. उभयसंघातील पहिला सामना हा 14 नोव्हेंबरला होणार आहे.

ध्रुव जुरेल याला कुणाच्या जागी संधी मिळणार?

ध्रुव विकेटकीपर बॅट्समन आहे. तर इंग्लंड दौऱ्यातील दुखापतीनंतर उपकर्णधार आणि विकेटकीपर असलेल्या ऋषभ पंत याचं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमधून भारतीय संघात कमबॅक झालं आहे. पंत पहिल्या सामन्यात खेळणार असल्याचं निश्चित आहे. त्यामुळे जुरेलला संधी मिळणं शक्य नसल्याचं म्हटलं जात आहे. मात्र ध्रुवला नितीश कुमार रेड्डी याच्या जागी संधी दिली जाऊ शकते.

पंतच्या जागी समावेश

पंतला झालेल्या दुखापतीनंतर ध्रुवला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. तसेच ध्रुवला नुकतीच खेळण्याची संधी मिळाली. ध्रुव इंग्लंडनंतर मायदेशात विंडीज विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये खेळला होता. ध्रुवने गेल्या काही महिन्यात चाबूक कामगिरी केली आहे. त्यामुळे ध्रुवला सहजासहजी वगळता येणार नाही. त्यामुळे ध्रुवचं खेळणं निश्चित समजलं जात आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ध्रुव जुरेलची आकडेवारी

ध्रुवने कसोटी पदार्पणानंतर सातत्याने चांगली कामगिरी केली. ध्रुवने 140, 1 आणि 56, 125, 44 आणि 6 तसेच 132 आणि 127 अशा धावा केल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे या विकेटकीपर बॅट्समने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्येही आपली छाप सोडली आहे. ध्रुवने गेल्या 8 डावांमध्ये 3 वेळा शतक आणि 1 अर्धशतक झळकावलं आहे.

पंत असताना ध्रुवला संधी कशी मिळेल?

टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने गेल्या काही काळात संघात अनेक बदल केले आहेत. गंभीर कोच झाल्यापासून टीम इंडियात आठव्या स्थानापर्यंत बॅटिंग करतील असेल खेळाडू आहेत. त्या हिशोबाने ध्रुव जुरेल याला संधी मिळू शकते. आता टीम मॅनेजमेंट याबाबत काय निर्णय घेते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.