AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL, 2nd ODI : टीम इंडिया कोलकातात सीरिज जिंकणार? कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

2nd ODI, IND v SL : टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकासाठी 'करो या मरो'चा सामना आहे.

IND vs SL, 2nd ODI : टीम इंडिया कोलकातात सीरिज जिंकणार? कशी असेल प्लेइंग इलेव्हन?
| Updated on: Jan 11, 2023 | 11:46 PM
Share

IND vs SL, 2nd ODI : टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात गुरुवारी 12 जानेवारीला कोलकातामधील इडन गार्डनमध्ये (Eden Garden) दुसरा एकदिवसीय(2nd ODI) सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना मालिकेच्या दृष्टीने निर्णायक असणार आहे. टीम इंडियाला दुसरा सामना जिंकून मालिकाही जिंकण्याची संधी आहे. तर श्रीलंकासाठी ‘करो या मरो’चा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात चांगलीच झुंज पहायला मिळण्याची शक्यता आहे. (ind vs sl 2nd odi match preview team india playing eleven head to head against sri lanka at eden garden kolkata)

आकडेवारी कुणाच्या बाजूने?

दोन्ही संघात आतापर्यंत 163 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये टीम इंडिया श्रीलंकावर वरचढ आहे. टीम इंडियाने 163 पैकी 94 सामन्यात श्रीलंकावर विजय मिळवला आहे. तर श्रीलंकेने टीम इंडियाचा 57 मॅचमध्ये पराभव केलाय. 11 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर 1 सामना बरोबरीत सुटला आहे.

कशी असणार प्लेइंग इलेव्हन?

साधारणपणे विजयी संघातील प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला जात नाही. पहिल्या सामन्यात शुबमन गिलसाठी द्विशतकवीर इशान किशनला बाहेर बसवण्यात आलं होतं. तर सूर्यकुमार यादवऐवजी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. या निर्णयामुळे टीम मॅनेजमेंट आणि कॅप्टन रोहित शर्मावर सडकून टीका करण्यात आली होती. मात्र आता दुसऱ्या सामन्यात रोहित आहे तीच प्लेइंग इलेव्हन कायम ठेवणार की इशान आणि सूर्यकुमारला संधी देणार, हे ही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), हार्दिक पंड्या (उप-कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल, ईशान किशन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.

टीम श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार), कुशल मेंडिस (उपकर्णधार), पथुम निशांका, अविश्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमे, चरिथ असालंका, धनंजय डि सिल्वा, आशेन बांद्रा, महीष तिक्षाणा, जेफरी वेंडरसे, चमिका करुणारत्ने, दिलशान मधुशंका, कसुन रजिथा, नुवांदु फर्नांडो, दुनिथ वेल्लागे, प्रमोद मुधशन आणि लाहिरु कुमारा.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.