Maharashtra News LIVE : मनोज जरांगे यांच्याकडून तिसऱ्यांदा आझाद मैदान पोलीस ठाण्यात अर्ज
Maharashtra News LIVE : आजपासून महाराष्ट्रात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी भक्तांनी जोरदार तयारी केली होती. राज्याच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रातील गणेशोत्सवाच्या सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES
-
श्रीनगरच्या ऐतिहासिक मंदिरात ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष!
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील ऐतिहासिक ‘गणपत्यॉर’ मंदिरात स्थानिक काश्मिरी पंडितांनी अत्यंत भक्तीभावाने आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा केला. झेलम नदीच्या काठी असलेल्या हब्बा कडल भागातील या शतकानुशतके जुन्या मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी काश्मिरी पंडित आणि स्थानिक भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
#WATCH | J&K | Kashmiri Pandits celebrated Ganesh Chaturthi with deep devotion and religious fervour at the historic Ganpatiyar Temple in Habba Kadal, Srinagar. pic.twitter.com/JNbly2G4ZU
— ANI (@ANI) September 14, 2026
-
शिमल्यात गणेशोत्सवाचा उत्साह; ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मिरवणूक
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या शिमल्यामध्ये भव्य आणि पारंपरिक गणपती मिरवणूक अत्यंत उत्साहात काढण्यात आली. डोंगराळ भागातील कडक थंडी आणि निसर्गरम्य वातावरणात हजारो भाविकांनी एकत्र येत ‘गणपती बाप्पा मोरया’ आणि ‘मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण शिमला शहर दणाणून सोडले.
#WATCH | Himachal Pradesh | Grand Ganpati procession taken out in Shimla on the occasion of Ganesha Chaturthi pic.twitter.com/B94TteyKsr
— ANI (@ANI) September 14, 2026
-
-
शिर्डीत बनावट पूजा साहित्य विक्रेत्यावर नगरपरिषदेची कारवाई
शिर्डी शहरामध्ये पूजेच्या साहित्याच्या दुकानावर एक धक्कादायक प्रकार शिर्डी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आलाय. शिर्डी शहरामध्ये थाटलेल्या पूजा विक्री साहित्याच्या दुकानात हरतालिकाच्या पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम सापडल्याने एकच खळबळ उडालीय…शिर्डी नगर परिषदेचा कर्मचारी पूजेचे साहित्य घेण्यासाठी गेला असता त्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आलाय.
-
महाराष्ट्र एफडीएविरोधात दिल्ली हायकोर्टात केलेली विमान इलायची कंपनीची याचिका फेटाळली
महाराष्ट्र एफडीएविरोधात दिल्ली हायकोर्टात केलेली विमान इलायची कंपनीची याचिका फेटाळली. हे प्रकरण आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगत दिल्ली हायकोर्टाने फेटाळली याचिका आहे. मुंबई हायकोर्टात दाद मागण्याचे कंपनीला निर्देश दिले. विमल पान मसाल्यासंदर्भात अभिनेते अजय देवगण, शाह रुख खान आणि टायगर श्रॉफ यांना देण्यात आलेली याचिका रद्द करण्याची केली होती.
-
मनोज जरांगे यांच्याकडून तिसऱ्यांदा आझाद मैदान पोलीस ठाण्यात अर्ज
मनोज जरांगे यांच्याकडून तिसऱ्यांदा आझाद मैदान पोलीस ठाण्यात अर्ज करण्यात आला. 18 तारखेच्या आंदोलनासाठी जरांगे पाटील यांनी परवानगी मागितली. 18 तारखेला फक्त 50 आंदोलकांना परवानगी द्या असा, असा अर्ज करण्यात आला आहे. आझाद मैदान पोलीस यावेळीही परवानगी नाकारण्याच्या तयारीत आहे.
-
-
मुक्ताईनगर राष्ट्रीय एल 53 महामार्गावर भीषण अपघात
मुक्ताईनगर राष्ट्रीय एल 53 महामार्गावर भीषण अपघात झाला. ट्रक मोटरसायकलचा अपघातात एक जण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला. अपघातात धडापासून मुंडक वेगळं झाल्याने संतप्त नागरिकांनी ट्रकच्या काचा फोडल्या. अपघात ग्रस्त हे रावेर तालुक्यातील असल्याची माहिती घटनास्थळी पोलीस दाखल असून मोठा जमाव या ठिकाणी जमला आहे पोलिसांचा तपास या ठिकाणी सुरू आहे
-
आंदोलनाच्या परवानगीसाठी जरांगे यांच्यावतीने पुन्हा एकदा नव्याने हालचाली
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनाची परवानगी पोलिसांनी दुसऱ्यांदा नाकारल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्याने हालचाली सुरू केल्या आहेत, मनोज जरांगे आणि त्यांच्या चार ते पाच सहकाऱ्यांनी आंदोलनाची परवानगी मिळावी यासाठी मुंबईतील वकील बांधव परवानगी अर्ज घेऊन आझाद मैदान पोलिसांकडे गेले असल्याची माहिती जरांगे पाटलाचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी दिली आहे,
-
-
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थोड्याच वेळात लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल होणार आहेत. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी काल रात्रीपासूनच भाविकांची गर्दी सुरु झाली आहे. नवसाची रांग आणि चरणस्पर्श रांगेत लोक रांगा लावून उभे आहेत.
-
गणरायाच्या हातात पुस्तक; उमरग्यात वाचन संस्कृतीचा जागर
धाराशिव च्या उमरगा येथे गणेशोत्सवानिमित्त यंदा अनोख्या ‘पुस्तक वाचणाऱ्या गणपती’ची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. प्रा. शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या शाखेत हा उपक्रम राबविण्यात आला. गणरायाला हार-फुलांऐवजी पुस्तकांचा प्रसाद देण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
-
२१ हजार पाणीपुरी पासून साकारली १३ फुटी गणपती बाप्पांची मूर्ती
गणेशोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळतंय. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत गणेश उत्सवात आनंदाची पर्वणी अनुभवता येते. पुणे तिथे काय उणे असं म्हणतात याचीच प्रचिती सध्या पुण्यातील फर्ग्युसन रोडवरील पाणीपुरी पासून साकारलेला गणपती पाहून येत आहे.
-
आधीच गर्दी, पोलीस बंदोबस्तासाठी अपुरे पडत- छगन भुजबळ
मुंबईत आधीच गर्दी आहे. पोलीस बंदोबस्तासाठी अपुरे पडत आहेत. त्यामुळे आंदोलनाला परवानगी नाकारली असेल. महिलांच्या विरोधात बोलण, जिल्हाधिकारी महिला आहेत त्यांना वाईट बोलणं, मुख्यमंत्री यांना वाईट बोलणं ही त्यांची संस्कृती आहे असे छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी म्हटले आहे.
-
पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीच्या मिरवणूकीला सुरवात
पुण्याचा राजा अशी तिसरा मानाचा गुरुजी तालीम गणपतीची ओळख आहे. मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीची मिरवणुकीत उंदरावर विराजमान झालेली गणेशाची मूर्ती पाहायला मिळाली. पारंपरिक पद्धतीने आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीला सुरवात झाली आहे.
-
राणे कुटुंबीयांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन
राणे कुटुंबीयांच्या जुहू येथील घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पा पूजेला सुरुवात झाली आहे. नारायण राणे आणि नितेश राणे गणपतीच्या पूजेसाठी उपस्थित होते.
-
जळगावात आकाशवाणी चौकात बाप्पाचे आगमन
जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात बाप्पाला घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मुहूर्तावर बाप्पाची स्थापना व्हावी म्हणून सकाळपासूनच बाप्पाला घेऊन जाण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे.
-
ठाण्यात आमदार रवींद्र फाटकांच्या घरी बाप्पाचं थाटात आगमन
ठाण्यात आमदार रवींद्र फाटकांच्या घरी बाप्पाचं थाटात आगमन; फुलं-पानांच्या पर्यावरणपूरक आरासीतून ‘इको-फ्रेंडली’ गणेशोत्सवाचा संदेश! ठाण्यात आमदार रवींद्र फाटक यांच्या निवासस्थानी लाडक्या गणरायाचं थाटात आगमन. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात बाप्पाचं स्वागत. नारळाच्या झाडाची पानं आणि विविध रंगांच्या फुलांपासून आकर्षक आरास. आठ ते दहा दिवस रात्रंदिवस तयारी; दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न. बाप्पाच्या दर्शनासाठी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि ठाणेकरांची उपस्थिती. महाराष्ट्रात चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांना सुख-समृद्धी मिळावी आणि जनतेचं कल्याण व्हावं, अशी फाटकांची गणरायाकडे प्रार्थना.
-
गणेशोत्सवाचा वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत…-रोहित टिळक
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली त्या गणेशोत्सवाचा वारसा आम्ही पुढे घेऊन जात आहोत…पारंपारिक वाद्यांमध्ये व दरवर्षी पालखी खांद्यावरून केसरी वाडा गणपती चे आगमन होत…गणेशोत्सवातुन प्रबोधनाचा वारसा आम्ही चालवत आहोत… पारंपारिक वाद्यांना प्राधान्य दिले पाहिजे डिजे ही आपली संस्कृती नाही….रोहित टिळक म्हणाले.
-
सणासुदीच्या तोंडावर फुलशेती संकटात!
धाराशिव जिल्ह्यात गेल्या ४० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने फुलशेती करणारे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सणासुदीच्या काळात फुलांना मागणी वाढण्याची अपेक्षा असताना बाजारात झेंडूच्या फुलांना अवघा ५ ते १० रुपये किलो भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. गेल्या वर्षी ७० रुपये किलोने विकलेला झेंडू यंदा ५ ते १० रुपयांवर आला आहे. एकरी फुलशेतीसाठी दीड ते पावणेदोन लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र सध्याच्या कवडीमोल भावामुळे उत्पादन खर्चही निघणे मुश्किल झाले आहे. या संदर्भात फुलाच्या प्लॉटवरून आढावा घेतलाय.
-
पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात
पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणूकीला सुरवात…..पारंपरिक पद्धतीने आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीला सुरवात…पुण्यातील केळकर रस्ता येथून मिरवणूकीला सुरवात…गणेशभक्तांची मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी…दुपारी 12.15 वाजता होणार प्राणप्रतिष्ठा.
-
पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा गणपती आगमन मिरवणूकीला सुरुवात
पुण्यातील मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा गणपती आगमन मिरवणूकीला सुरुवात….गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया भक्तिमय सुरात उत्साहाचं वातावरण…
-
ढाल तलवारी पथकातील मुलींनी केलं जल्लोषात लाडक्या गणरायाचं स्वागत
शौर्याचं प्रतीक असलेले ढाल तलवारी घेऊन आम्ही लाडक्या गणरायाचं स्वागत करत आहोत….झाशीची राणी ढाल तलवारी घेऊन लढल्या आम्ही पण संस्कृतीचा वारसा जपत आहोत याचा आम्हाला आनंद होत आहे…..विचारांचा वारसा आपला आहे तोच आम्ही पुढे चालवत आहोत अशी प्रतिक्रिया ढाल तलवारी पथकातील मुलींनी दिली यांच्याशी संवाद साधला आहे.
-
कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी
कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष! कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यातील गणपती कार्यशाळांमध्ये भाविकांची मोठी गर्दी. लाडक्या बाप्पाला घरी नेण्यासाठी ढोल-ताशांसह सजलेल्या गाड्यांची लगबग. गणेशमूर्ती घेण्यासाठी कुटुंबासह भाविक कार्यशाळांमध्ये दाखल. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला. बाप्पाच्या आगमनासाठी भाविकांमध्ये उत्साह; कुंभारवाड्यात भक्तिमय वातावरण. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाच्या आगमनाची लगबग शिगेला.
-
मनसे नेते गजानन काळे यांचे अमित शहा आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत
मनसे नेते गजानन काळे यांचे अमित शहा आज नवी मुबंई दोऱ्यावर आहेत त्यांनिमित्त महाराष्ट्राच्या भूमीवर आयोजित हिंदी राजभाषा संमेलनात महाराष्ट्राच्या राज्यगीताचा सन्मानपूर्वक समावेश करावा तसेच नवी मुंबईतील “महाराष्ट्र भवन” व “मराठी भाषा भवन” उपकेंद्र बांधकाम पूर्णत्वाची निश्चित तारीख जाहीर करावी याबाबत. अशी पोस्ट ट्विटरवर शेअर केलीय
-
गणेश चतुर्थीनिमित्त आमदार बांगर काय म्हणाले?
हिंगोली- गणेश चतुर्थीच्या दिवशी मी महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की कोरडा दुष्काळ जाहीर करावा. गणेश मूर्ती खरेदी करतांना आमदार बांगर यांची राज्य सरकार ला विनंती. बळीराजा संकटात आहे त्या संकटातून सावरण्याची शक्ती बळीराजाला श्री गणेशांनी द्यावी आमदार बांगर यांची प्रतिक्रिया..
-
नाशिकमध्ये 27 हजार रुपये किलोचा मोदक
नाशिक मध्ये 27 हजार रुपये किलोचा मोदक उपलब्ध करण्यात आला आहे . बाप्पांना प्रिय असणारे विविध फ्लेवरचे मोदक बाजारात उपलब्ध आहेत. 27 हजार रुपये किलोच्या मोदकला नागरिकांकडून मागणी आहे. ओरिजनल सोन्याचं वर्क असलेला 27 हजार रुपये किलोचा मोदक उपलब्ध आहे . सोने चांदी सह विविध फ्लेवरचे गणरायाचे प्रिय असे मोदक आकर्षक आणि स्वादिष्ट मोदक उपलब्ध आहेत.
-
खासदार विनोद तावडे यांच्या घरी बाप्पाचे आगमन
दरवर्षीप्रमाणे यंदाही भाजपचे राष्ट्रीय महासचिव खासदार विनोद तावडे यांच्या घरी बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन होत आहे. विनोद तावडे आपल्या संपूर्ण कुटुंबासह गणपती बाप्पाला घ्यायला पोहोचले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात, मोठ्या जल्लोषात बाप्पाचे त्यांच्या घरी आगमन होत आहे. संपूर्ण तावडे कुटुंबात यावेळी उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
-
पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग आगमन गणपती मिरवणुकीला सुरुवात
मानाचा चौथा श्री तुळशीबाग आगमन गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरवणूक रथाला फुलांची आकर्षक सजावट पाहायला मिळत आहे. गणेश भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मुख्य सभामंडपातून श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. साडेबारा वाजता अयोध्येतील श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी महाराज यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे.
-
ई-बाईकवर विराजमान बाप्पा, दिला इंधन बचतीचा संदेश
जळगावात कांचन नगरातील जय जगदंबा मित्र मंडळाच्या गणरायाचा दिमाखात आगमन सोहळा पार पडला. यंदा ई-बाईकवर विराजमान बाप्पा असून ‘इंधन बचाव, देश बचाव’चा संदेश दिला. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक वेशभूषेत कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू आहे. या उत्साहपूर्ण वातावरणात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बाप्पाचे जल्लोषात स्वागत केले.
-
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी रांग
लालबागच्या राजाच्या चरण स्पर्श दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. दर्शनासाठी भक्तांची ५ ते ६ किलोमीटर पर्यंत रांग आहे. लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांमध्ये आतुरता निर्माण झाली आहे. दर्शनासाठी भाविक आतूर असून लहान मोठे भक्त दर्शनासाठी आतूर झाले आहेत.
-
जळगावात गणेशोत्सवात पोलीस मुख्यालयात ‘एक खिडकी योजना’
गणेशोत्सवासाठी जळगावात पोलीस मुख्यालयात ‘एक खिडकी योजना’ सुरू केली आहे. ५८ सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत परवानगी घेतली. तर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केंद्राला भेट देत कामाचा आढावा घेतला. मनपा कर्मचारी आणि पोलिस अंमलदारांच्या कामकाजाची एसपींकडून पाहणी करण्यात आली. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर एकाच ठिकाणी परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-
उद्धव ठाकरे मुंबईच्या राजाच्या दर्शनाला किती वाजता येणार?
यंदाचं मंडळाचं ९९ वर्ष आहे आणि या वर्षी आम्ही २२ फुटांची बॅलन्सिंग अशी बाप्पाची बाल मूर्ती ही साकारली आहे आणि मनमोहक दृश्य हे पाहायला मिळत आहे. यंदा गणेश गल्लीत संत-महात्मे यांचा देखावा हा सादर केला आहे आणि संत परंपरा ही कशी सर्वोत्तम आहे याचा देखावा हा साकारला आहे. पोलिसांच्या नियमांच पालन आपण करतो त्याचप्रमाणे आम्ही गर्दीच नियोजन देखील केलं आहे. मंडळाचे पदाधिकारी हे प्रत्येकी ८ तासांच्या शिफ्ट मध्ये काम करणार आहेत. उद्धव ठाकरे हे सहकुटुंब मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी १२:३० ते १ च्या दरम्यान येणार आहेत.
-
‘बाप्पाच्या स्वागतासाठी ठाणेकरांची लगबग; तीन हात नाका परिसरात ढोल-ताशांच्या गजरात भक्तीचा जल्लोष!’
तीन हात नाका परिसरातील गणपती कार्यशाळांमध्ये बाप्पाच्या मूर्ती घेण्यासाठी भाविकांची गर्दी. महिनाभराच्या तयारीनंतर गणरायाच्या आगमनाचा उत्साह ठाणेकरांच्या चेहऱ्यावर. ढोल-ताशांचा गजर, फुलांनी सजलेल्या गाड्या आणि गुलालाची उधळण. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने तीन हात नाका परिसर दुमदुमला. लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येकाचा उत्साह शिगेला. घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी भक्तांची लगबग.
-
गणेशोत्सवांमध्ये वडाळ्याच्या GSB गणपतीचेही विशेष स्थान
मुंबईतील प्रसिद्ध गणेशोत्सवांमध्ये वडाळ्याच्या GSB गणपतीचेही विशेष स्थान आहे. यंदा या गणेशोत्सवाला तब्बल 72 वर्षांची परंपरा पूर्ण होत आहे. सर्वाधिक सोन्या, चांदीने सजवलेली गणपती बाप्पांची मूर्ती गणेश भक्तांचे श्रद्धास्थान आहे. धार्मिक श्रद्धा, पारंपरिक पद्धती आणि सामाजिक सेवेचा अनोखा संगम या गणेशोत्सवात पाहायला मिळतो. या मंडळाच्या गणपतीची स्थापना तब्बल 72 वर्षांपूर्वी करण्यात आली. 2026 मध्ये या परंपरेला 72 वर्षे पूर्ण होत आहेत. मंडळाची परंपरा श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाशी संबंधित असल्याचे मंडळाच्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.
-
पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीची मिरवणूक किती वाजता निघणार?
पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची मिरवणूक निघणार पारंपारिक पद्धतीने. सकाळी आठ वाजता मुख्य मंडप येथून मिरवणूक सुरू होणार आहे. रास्ता पेठ येथून पालखी मध्ये गणेश विराजमान झाल्यानंतर मिरवणूकीला सुरुवात. मानाचा पहिला श्री कसबा गणपतीची 11.45 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार. ढोल ताशांच्या गजरात श्री कसबा गणपतीची मिरवणूक पार पडणार.
-
Dagdusheth Ganpati 2026 : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मयुरेश्वर रथातून निघणार मिरवणूक
सकाळी 8.30 वाजता रमणबाग येथून मिरवणुकीला होणार सुरुवात. मयुरेश्वर रथाला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलीय. यावर्षी वृंदावन मधील प्रेमाचं प्रतीक असलेल्या मंदिराचा देखावा करण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक सजावट. सकाळपासूनच दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी उसळली आहे.
-
अंबरनाथमध्ये भर पावसात गणरायाचं आगमन
अंबरनाथमध्ये भर पावसात गणरायाचं आगमन झालं. डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन भक्तांचा उत्साह. बाप्पाच्या आगमनात बच्चे कंपनीचा जल्लोष. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला.
-
Lalbaugcha raja 2026 : लालबागच्या राजाच्या दर्शनाला अलोट गर्दी
कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबाग राजाच्या दर्शनाला सकाळपासून अलोट गर्दी झाली आहे. कालपासूनच भक्तगण नवसाच्या रांगेत थांबले होते. नवसाला पावणारा गणपती अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उद्धव ठाकरे आज लालबाग राजाच्या दर्शनाला येणार आहेत.
-
Mumbaicha Raja 2026 : मुंबईच्या राजाची आरती सुरु
मुंबईचा राजा असलेल्या गणेश गल्लीतील गणपती बाप्पाच्या पूजेला सुरवात झाली आहे.गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील सर्व पदाधिकारी आणि भक्तगण या पूजेला उपस्थित आहेत. आरती सुरु आहे.
महाराष्ट्रात आजपासून मोठ्या उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणेशचतुर्थीचा आज पहिला दिवस आहे. सकाळपासून मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील विविध भागात गणपती दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपतींची सुद्धा मनोभावे पूजाअर्चा सुरु आहे. अनेकांची बऱ्याच दिवसांपासून घरगुती गणपतीसाठी तयारी सुरु आहे. आज तो दिवस आला आहे. मुंबईतील चाकरमनी, नोकरदार वर्ग गणपतीसाठी गावी गेला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, कोकण या भागातही गणेशचतुर्थीचा मोठा उत्साह पहायला मिळतोय. काल मुंबापुरीला पावसाने झोडपून काढलं. पण गणेशचतुर्थीचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही. मागच्या बऱ्याच दिवसांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. गणरायाने पावसाची चिंता मिटवावी हीच सर्वांची प्रार्थना आहे.
Published On - Sep 14,2026 7:04 AM
