IND vs SL : टीम इंडियाचा 317 धावांनी दणदणीत विजय, श्रीलंकेला क्लीन स्वीप

टीम इंडियाने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेवर 317 धावांनी विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने श्रीलंकेचा टी 20 मालिकेनंतर एकदिवसीय मालिकेतही पराभव केला आहे.

IND vs SL : टीम इंडियाचा 317 धावांनी दणदणीत विजय, श्रीलंकेला क्लीन स्वीप
Follow us
| Updated on: Jan 15, 2023 | 8:11 PM

तिरुवअनंतपूरम : टीम इंडियाने श्रीलंकेवर तिसऱ्या वनडे सामन्यात 317 धावांनी धमाकेदार विजय मिळवला आहे. या विजयासह टीम इंडियाने श्रीलंकेचा 3-0 असा क्लिन स्वीपने विजय मिळवलाय. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयसाठी 391 धावांचं तगडं आव्हान दिलं होतं. मात्र मोहम्मद सिराज याच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या गोलंदाजांनी शरणागती पत्कारली. भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 22 ओव्हरमध्ये 73 धावांवरच ऑलआऊट केलं.

श्रीलंककेडून नुवानिदू फर्नांडोने सर्वाधिक 19 रन्स केल्या. कसून राजथाने 13 धावांचं योगदान दिलं. तर कर्णधार दासून शनाकाने 11 रन्स केल्या. तर 6 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

हे सुद्धा वाचा

टीम इंडियाचा मोठा विजय

दरम्यान त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 391 धावांच आव्हान दिलं होतं. टीम इंडियाकडून विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद 166 धावांची खेळी केली. तर युवा शुबमन गिलनेही 116 रन्सची शतकी खेळी. शुबमन आणि विराट व्यतिरिक्त टीम इंडियाकडून रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर या दोघांनी 42 आणि 38 धावांचं योगदान दिलं.

आता मिशन न्यूझीलंड

टीम इंडियाने श्रीलंकेवर टी 20 आणि वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला. त्यानंतर आता टीम इंडियासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात न्यूझीलंड टीम इंडिया विरुद्ध एकदिवसीय आणि टी 20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला 18 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि वॉशिंगटन सुंदर.

श्रीलंका प्लेइंग XI : दसुन शनाका (कॅप्टन), अविष्का फर्नांडो, एन. फर्नांडो, कुसल मेंडिस, आसेन बंडारा, चरिथ असालंका, वानिंदु हसारंगा, जेफरी वेंडरसे, कसुन रजित, चामिका करूणारत्ने आणि लाहिरू कुमारा.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.