IND vs SL: बुमराहने 5 विकेट्ससह श्रीलंकेचं कंबरडं मोडलं, कपिल-इरफानचे रेकॉर्ड मोडित
भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या डे-नाइट कसोटी (Pink Ball Test) सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवलं. भारताने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर पहिल्या डावात 252 धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 92 धावा केल्या.

बंगळुरु : भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या डे-नाइट कसोटी (Pink Ball Test) सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवलं. भारताने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर पहिल्या डावात 252 धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 92 धावा केल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने टिच्चून मारा केला. त्यांनी आपल्या गोलंदाजीने श्रीलंकन फलंदाजांना चांगलंच सतावलं. श्रीलंकेने पहिल्या दिवसाच्या अखेरीस सहा विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. आज भारतीय गोलंदाजांनी केवळ 6 षटकात पाहुण्यांच्या उरलेल्या 4 फलंदाजांना बाद केलं. श्रीलंकेचा संघ (Sri Lanka Inning) 109 धावांवर गारद झाला आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवी अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.
जसप्रीत बुमराहने व्हाईट आणि रेड बॉलने एका डावात पाच विकेट घेण्याची किमया याआधी अनेकदा केली आहे. दरम्यान, आज त्याने पिंक बॉलने गोलंदाजी करताना पाच विकेट घेतल्या आहेत. आजच्या कामगिरीसह बुमराहने अनेक मोठमोठ्या गोलंदाजांचे रेकॉर्ड मोडित काढले आहेत.
पिंक बॉल कसोटीच्या पहिल्या डावात श्रीलंकेचा डाव अवघ्या 109 धावांवर आटोपला. यादरम्यान बुमराहने एकट्याने 5 विकेट घेतल्या, म्हणजे अर्धा संघ त्याने तंबूत धाडला. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या डावात फक्त 10 षटके टाकली आणि 24 धावांत 5 बळी घेतले. बुमराहचा प्रत्येक चेंडू खेळणे श्रीलंकेच्या फलंदाजांना कठीण जात आहे. पेसपेक्षा फिरकीला अधिक सपोर्ट असलेल्या खेळपट्टीवर तो किलर गोलंदाजी करत होता. बुमराहने पहिल्या दिवसाच्या खेळात आपल्या 3 बळी घेतले होते. दुसऱ्या दिवशी 2 विकेट्स घेतल्याने श्रीलंकेने पहिला डाव लवकर आटोपला.
भारतात पहिल्यांदाच कसोटीत 5 विकेट्स
जसप्रीत बुमराहने भारतीय भूमीवर पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये 5 विकेट्स घेण्याचा चमत्कार केला आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेत एका डावात 5 बळी घेतले आहेत. पिंक बॉल कसोटीत त्याने पहिल्यांच अशी कामगिरी केली आहे.
That’s a FIVE-wkt haul for @Jaspritbumrah93 ??
This is his 8th in Test cricket.
Live – https://t.co/t74OLq6Zzg #INDvSL @Paytm pic.twitter.com/sNboEF4Gm8
— BCCI (@BCCI) March 13, 2022
दिग्गजांना मागे टाकलं
जसप्रीत बुमराहने 2018 साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो 29 कसोटी सामने खेळला आहे. यादरम्यान त्याने 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची ही 8 वी वेळ आहे. बुमराह आता सर्वात कमी कसोटी खेळून सर्वाधिक 5 बळी घेणारा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने कपिल देव यांना मागे टाकले आहे. कपिल देवने 29 व्या सामन्यात 8 वेळा 5 प्लस विकेट घेतल्या होत्या. इरफान पठाण या यादीत तिसर्या क्रमांकावर आहे, ज्याने 29 कसोटीत 7 वेळा 5 प्लस विकेट्स घेण्याचा चमत्कार केला आहे.
जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून 8 वेळा 5 प्लस विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान न्यूझीलंडच्या टीम साऊदीने कसोटीत 8 वेळा 5 प्लस विकेट्स घेतल्या आहेत.
इतर बातम्या
