IND vs SL, 2nd Test, Day 2, Live Score: दिवसअखेर श्रीलंकेची 1 बाद 28 पर्यंत मजल, विजयासाठी भारताला 9 विकेट्सची गरज

IND vs SL: भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या डे-नाइट कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवलं.

IND vs SL, 2nd Test, Day 2, Live Score: दिवसअखेर श्रीलंकेची 1 बाद 28 पर्यंत मजल, विजयासाठी भारताला 9 विकेट्सची गरज
भारत-श्रीलंका कसोटी सामना

|

Mar 13, 2022 | 10:19 PM

IND vs SL: भारत आणि श्रीलंकेमध्ये खेळल्या जाणाऱ्या डे-नाइट कसोटी सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावर भारताने वर्चस्व गाजवलं. भारताने फिरकीला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर पहिल्या डावात 252 धावा केल्या. श्रेयस अय्यरने सर्वाधिक 92 धावा केल्या. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीने टिच्चून मारा केला. त्यांनी आपल्या गोलंदाजीने श्रीलंकन फलंदाजांना चांगलंच सतावलं. श्रीलंकेने पहिल्या दिवसाच्या अखेरीस सहा विकेट गमावून 86 धावा केल्या होत्या. आज भारतीय गोलंदाजांनी केवळ 6 षटकात पाहुण्यांच्या उरलेल्या 4 फलंदाजांना बाद केलं. श्रीलंकेचा संघ 109 धावांवर गारद झाला आहे. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी आणि रवी अश्विनने प्रत्येकी दोन गडी बाद केले. अक्षर पटेलला एक विकेट मिळाली.

Key Events

पहिल्या डावात 143 धावांची आघाडी

भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावात संपुष्टात आला. भारताला पहिल्या डावात 143 धावांची आघाडी मिळाली.

जसप्रीत बुमराहची जबरदस्त गोलंदाजी

भारताच्या जसप्रीत बुमराहने जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने एकट्याने श्रीलंकेचा निम्मा संघ गारद केला.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 13 Mar 2022 10:14 PM (IST)

  दिवसअखेर श्रीलंकेची 1 बाद 28 पर्यंत मजल, विजयासाठी भारताला 9 विकेट्सची गरज

  दिवसअखेर श्रीलंकेच्या फलंदाजांनी 1 बाद 28 पर्यंत मजल मारली आहे. उर्वरित तीन दिवसात श्रीलंकेलाविजयासाठी 419 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला 9 विकेट्सची गरज आहे.

 • 13 Mar 2022 10:14 PM (IST)

  दिवसअखेर श्रीलंकेची 1 बाद 28 पर्यंत मजल, विजयासाठी भारताला 9 विकेट्सची गरज

  दिवसअखेर श्रीलंकेच्या फलंदाजांनी 1 बाद 28 पर्यंत मजल मारली आहे. उर्वरित तीन दिवसात श्रीलंकेलाविजयासाठी 419 धावांची आवश्यकता आहे. तर भारताला 9 विकेट्सची गरज आहे.

 • 13 Mar 2022 09:43 PM (IST)

  दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, श्रीलंकेच्या 28 धावा

  दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला,

  श्रीलंकेच्या 28 धावा झाल्या असून एक विकेट गेलीय

  श्रीलंकेसमोर विजयासाठी 447 धावांचं आव्हान

 • 13 Mar 2022 09:13 PM (IST)

  भारताला पहिलं यश, लाहिरु तिरुमाने शून्यावर बाद

  पहिल्याच षटकात जसप्रीत बुमराहने भारताला यश मिळवून दिलं आहे. त्याने सलामीवीर लाहिरु तिरुमाने याला तिसऱ्याच चेंडूवर पायचित पकडलं. (श्रीलंका 0/1)

 • 13 Mar 2022 09:06 PM (IST)

  श्रीलंकेच्या दुसऱ्या डावाला सुरुवात

  447 धावांचं लक्ष्य घेऊन श्रीलंकेचा संघ दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. श्रीलंकेचे सलामीवीर लाहिरु तिरुमाने आणि दिमुथ करुणारत्ने क्रीझवर दाखल. भारतीय कर्णधार रोहित शर्माने जसप्रीत बुमराहच्या हाती चेंडू सोपवला आहे.

 • 13 Mar 2022 08:52 PM (IST)

  303 धावांवर भारताचा डाव घोषित, श्रीलंकेसमोर 447 धावांचं लक्ष्य

  9 बाद 303 धावांवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने भारताचा डाव घोषित केला आहे. त्यामुळे आता दुसऱ्या डावात श्रीलंकेसमोर 447 धावांचं लक्ष्य आहे. गोलंदाजांसाठी अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर 447 धावा जमवणं श्रीलंकेच्या फलंदाजांसाठी अवघड असेल.

 • 13 Mar 2022 08:50 PM (IST)

  शमीचं आक्रमण

  श्रेयस बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या मोहम्मद शमीने जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याने 68 व्या षटकात प्रवीण जयविक्रमाच्या गोलंदाजीवर एक षटकार आणि एका चौकारासह 16 धावा वसूल केल्या.

 • 13 Mar 2022 08:48 PM (IST)

  भारताला 9 वा धक्का, श्रेयसपाठोपाठ अक्सर पटेल माघारी

  भारताने 9 वी विकेट गमावली आहे. लसिथ एम्बुलडेनिया याने अक्सर पटेलला (9) त्रिफळाचित करत पव्हेलियनचा रस्ता दाखवला. (भारत 303/9)

 • 13 Mar 2022 08:41 PM (IST)

  श्रीलंकेला मोठं यश, श्रेयस अय्यर 67 धावांवर बाद

  श्रीलंकेच्या गोलंदाजांना मोठ यश मिळालं आहे. पहिल्या डावात 92 धावांची खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावलं होतं. शतकाच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या श्रेयसला रोखण्यात श्रीलंकेचा गोलंदाज लसिथ एम्बुलडेनिया यशस्वी झाला आहे. त्याने श्रेयसला पायचित पकडलं. श्रेयसने 87 चेंडूत 9 चौकारांसह 67 धावा फटकावल्या

 • 13 Mar 2022 08:31 PM (IST)

  भारताला 7 वा धक्का, रवी अश्विन 13 धावांवर बाद

  भारताने 7 वी विकेट गमावली आहे. प्रवीण जयविक्रमा याने रवीचंद्रन अश्विनला 13 धावांवर असताना निरोशन डीकवेलाकरवी झेलबाद केलं. (भारत 278/7)

 • 13 Mar 2022 08:08 PM (IST)

  श्रेयसचा हल्लाबोल

  61 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या विश्वा फर्नांडोवर श्रेयसने पुन्हा एकदा हल्ला चढवला. या षटकात त्याने दोन चौकारांच्या मदतीने 10 धावा वसूल केल्या. तसेच धावफलाकवर 258 धावा झळकावल्या आहेत.

 • 13 Mar 2022 08:00 PM (IST)

  भारताचा 6 वा गडी माघारी, रवींद्र जडेजा 22 धावांवर बाद

  भारताचा 6 वा गडी माघारी परतला आहे. विश्वा फर्नांडोने रवींद्र जडेजाला 22 धावांवर असताला त्रिफळाचित केलं. (भारत 247/6)

 • 13 Mar 2022 07:57 PM (IST)

  श्रेयस अय्यरचं अर्धशतक

  59 व्या षटकात गोलंदाजीसाठी आलेल्या विश्वा फर्नांडोवर श्रेयसने हल्ला चढवला. षटकातील पहिल्याच चेंडूवर शानदार चौकार वसूल करत श्रेयस अय्यरने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. त्याने 69 चेंडूत 7 चौकारांसह 52 धावा केल्या.

 • 13 Mar 2022 07:20 PM (IST)

  भारताचं द्विशतक

  49 षटकात धावफलकावर भारताचं द्विशतक झळकलं आहे. रवींद्र जडेजा 14 तर श्रेयस अय्यर 22 धावांवर खेळत आहेत. (भारत 207/5)

 • 13 Mar 2022 06:40 PM (IST)

  भारताकडे 342 धावांची मोठी आघाडी

  दुसऱ्या सत्राचा खेळ संपला आहे. भारताच्या पाचबाद 199 धावा झाल्या आहेत. भारताकडे 342 धावांची मोठी आघाडी आहे.

 • 13 Mar 2022 06:03 PM (IST)

  पंतने लगावले सात चौकार, दोन षटकार

  हाफ सेंच्युरी झळकवल्यानंतर ऋषभ पंत आऊट झाला आहे. त्याने आक्रमक फलंदाजी केली. 31 चेंडूत 70 धावा करताना त्याने सात चौकार आणि दोन षटकार लगावले. भारताच्या पाच बाद 184 धावा झाल्या आहेत.

 • 13 Mar 2022 05:49 PM (IST)

  ऋषभ पंतची आक्रमक फलंदाजी

  आता ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरची जोडी जमली आहे. भारताच्या चार बाद 167 धावा झाल्या आहेत. पंत आक्रमक फलंदाजी करत आहे. 22 चेंडूत 41 धावा करताना त्याने पाच चौकार आणि दोन षटकार लगावले आहेत.

 • 13 Mar 2022 05:31 PM (IST)

  जयाविक्रमाने भारताला दिला चौथा धक्का

  जयाविक्रमाने भारताला चौथा धक्का दिला आहे. विराट कोहलीला त्याने 13 धावांवर पायचीत पकडलं. भारताच्या चार बाद 139 धावा झाल्या आहेत.

 • 13 Mar 2022 05:20 PM (IST)

  भारताला तिसरा धक्का, हनुमा विहारी क्लीन बोल्ड

  हुनमा विहारीच्या रुपाने भारताला तिसरा धक्का बसला आहे. जयाविक्रमाने त्याला क्लीन बोल्ड केलं. विहारीने 35 धावा केल्या. भारताच्या तीन बाद 124 धावा झाल्या आहेत.

 • 13 Mar 2022 05:07 PM (IST)

  सेट झालेला रोहित शर्मा 46 धावांवर आऊट

  सेट होऊन चांगली फलंदाजी करणारा रोहित शर्मा 46 धावांवर आऊट झाला. रोहित आज चांगली फलंदाजी करत होता. पण मोठा फटका खेळण्याच्या नादात त्याने आपली विकेट बहाल केली. डि सिलव्हाच्या गोलंदाजीवर त्याने मॅथ्यूजकडे झेल दिला. भारताच्या दोन बाद 100 धावा झाल्या आहेत.

 • 13 Mar 2022 04:42 PM (IST)

  रोहित-विहारी जोडीसमोर श्रीलंकन गोलंदाज हतबल

  24 षटकात भारताच्या एकबाद 81 धावा झाल्या आहेत. रोहित शर्मा 38 आणि विहारी 18 धावांवर खेळतोय.

 • 13 Mar 2022 04:17 PM (IST)

  पहिल्या सत्राचा खेळ संपला

  दुसऱ्या दिवसाचा पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे. भारताने दुसऱ्याडावात एक विकेट गमावून 61 धावा केल्या आहेत. मयंक अग्रवालच्या रुपात भारताने आपला एकमेव विकेट गमावला. भारताकडे आता 204 धावांची आघाडी आहे. रोहित 30 आणि विहारी 8 धावांवर खेळतोय.

 • 13 Mar 2022 04:06 PM (IST)

  रोहितने हनुमा विहारीच्या साथीने सावरला डाव

  मयंक अग्रवाल बाद झाल्यानंतर रोहित शर्माने हनुमा विहारीच्या साथीने मिळून डाव सावरला. भारताच्या एक बाद 61 धावा झाल्या आहेत. रोहित 30 आणि विहारी आठ धावांवर खेळतोय.

 • 13 Mar 2022 03:34 PM (IST)

  भारताला पहिला धक्का

  मयंक अग्रवालच्या रुपाने भारताचा पहिला गडी बाद झाला आहे. मयंकने 22 धावा केल्या. एमबुलडेनियाच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये डि सिलिव्हाने त्याचा सोपा झेल घेतला. भारताची स्थिती एक बाद 42 आहे.

 • 13 Mar 2022 03:25 PM (IST)

  भारताची सावध सुरुवात, रोहित-मयंकची संयमी फलंदाजी

  खेळपट्टी गोलंदाजीस अनुकूल असल्याने भारतीय सलामीवीरांनी सावध आणि संयमी सुरुवात केली आहे. 9 षटकात भारताने धावफळकावर 35 धावा झळकावल्या आहेत. रोहित शर्मा 18 आणि मयंक अग्रवाल 17 धावांवर खेळत आहेत.

 • 13 Mar 2022 02:45 PM (IST)

  भारताच्या दुसऱ्या डावाला सुरुवात, रोहित-मयंक जोडी मैदानात

  श्रीलंकेच्या संघाला पहिल्या डावात 109 धावात रोखल्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. भारतीय सलामीवीर जोडी रोहित शर्मा आणि मयंक अग्रवाल क्रिझवर दाखल झाले आहेत. तर श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याने चेंडू सुरंगा लकमलच्या हाती सोपवला आहे.

 • 13 Mar 2022 02:31 PM (IST)

  अखेरचा फलंदाज माघारी, विश्वा फर्नांडो 8 धावांवर बाद

  श्रीलंकेचा अखेरचा फलंदाज माघारी परतला आहे. रवीचंद्रन अश्विनने विश्वा फर्नांडोला 8 धावांवर असताना ऋषभ पंतकरवी यष्टीचित केलं. (श्रीलंका 109/10)

 • 13 Mar 2022 02:26 PM (IST)

  श्रीलंकेला 9 वा धक्का, निरोशन डीकवेला 21 धावांवर बाद

  बुमराहचा पाचवा बळी

  श्रीलंकेचा 9 वा गडी माघारी परतला आहे. जसप्रीत बुमराहने निरोशन डीकवेला याला 21 धावांवर असताना यष्टीरक्षक ऋषभ पंतकरवी झेलबाद केलं. (श्रीलंका 100/9)

 • 13 Mar 2022 02:21 PM (IST)

  भारताला 8 वं यश, सुरंगा लकमल 5 धावांवर बाद

  भारताला 8 वं यश मिळालं आहे. रवीचंद्रन अश्विनने सुरंगा लकमल याला 5 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (श्रीलंका 100/8)

 • 13 Mar 2022 02:14 PM (IST)

  बुमराहने श्रीलंकेला दिला झटका

  दुसऱ्यादिवसाची श्रीलंकेची खराब सुरुवात झाली आहे. जसप्रीत बुमराहने लसिथ एमबुलडेनियाला बाऊन्सरवर एक रन्सवर ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. श्रीलंकेची सातबाद 95 स्थिती झाली आहे.

 • 13 Mar 2022 02:07 PM (IST)

  पहिल्या षटकात दोन चौकार

  दुसऱ्या दिवसाची सुरुवात जसप्रीत बुमराहच्या षटकाने झाली. पहिल्याच ओव्हरमध्ये डिकवेलाने दोन चौकार लगावले. श्रीलंकेची सहाबाद 94 अशी स्थिती आहे.

 • 13 Mar 2022 02:03 PM (IST)

  शमीचा भेदक मारा

  पहिल्या दिवशी मोहम्मद शमीने दोन विकेट काढल्या होत्या. आज सुद्धा शमी श्रीलंकन संघासाठी तितकाच धोकादायक ठरु शकतो.

 • 13 Mar 2022 01:54 PM (IST)

  फिरकी गोलंदाज आज जलवा दाखवणार?

  ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना अनुकूल आहे. पण भारतीय फिरकी गोलंदाजांऐवजी वेगवान गोलंदाज यशस्वी ठरत आहेत. काल वेगवान गोलंदाजांनी पाच विकेट काढल्या.

Published On - Mar 13,2022 1:48 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें