AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : टीम इंडियाचे 7 खेळाडू श्रीलंकेत करणार डेब्यू, इथे पहा पूर्ण लिस्ट

IND vs SL : टीम इंडियाचा श्रीलंका दौरा 27 जुलैपासून सुरु होत आहे. या T20 सीरीजमध्ये 7 भारतीय खेळाडू पहिल्यांदा श्रीलंकेत खेळणार आहेत. T20 सीरीज नंतर वनडे मालिका होईल.

IND vs SL : टीम इंडियाचे 7 खेळाडू श्रीलंकेत करणार डेब्यू, इथे पहा पूर्ण लिस्ट
IND vs SLImage Credit source: PTI
| Updated on: Jul 23, 2024 | 9:04 AM
Share

टीम इंडियाचे 15 खेळाडू श्रीलंका दौऱ्यासाठी रवान झाले आहेत. भारतीय टीमने मुंबईवरुन कोलंबोला प्रयाण केलं. टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये 27 जुलै पासून सीरीज सुरु होणार आहे. दौऱ्याची सुरुवात T20 सीरीजने होणार आहे. यात टीम इंडियाचे 7 खेळाडू श्रीलंकन भूमीवर डेब्यु करतील. तुम्ही विचार करत असाल, श्रीलंका सीरीजसाठी निवडलेल्या 15 खेळाडूंमध्ये ते 7 प्लेयर कोण असतील? जे श्रीलंका दौऱ्यावर पहिल्यांदा जाणार आहेत. या 7 प्लेयर्समध्ये 3 गोलंदाज, 2 ऑलराऊंडर आणि 2 फलंदाज आहेत. श्रीलंका दौऱ्यावर डेब्यु करणाऱ्या त्या सर्व खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.

हे आहेत ते 7 प्लेयर

सर्वात पहिलं आणि हैराण करणारं नाव म्हणजे खलील अहम. टीम इंडियाकडून डेब्यु करुन त्याला 6 वर्ष झाली आहेत. 2018 मध्ये तो पहिला T20 सामना खेळलेला. श्रीलंकेत कुठलाही T20 सामना खेळण्याची त्याची ही पहिली वेळ असेल.

यशस्वी जैस्वाल सुद्धा श्रीलंकेत पहिल्यांदा T20 मॅच खेळताना दिसेल. 2019 मध्ये T20 इंटरनॅशनलमध्ये जैस्वालने डेब्यु केला. पण श्रीलंकेत खेळण्याची त्याची पहिली वेळ असेल.

2023 मध्ये T20 मध्ये डेब्यु केल्यापासून रिंकू सिंह भारतासाठी आतापर्यंत 20 सामने खेळलाय. पण श्रीलंकन भूमीवर तो एकही सामना खेळलेला नाही. श्रीलंकेत पहिल्यांदा रिंकू सिंह T20 मध्ये चौकार, षटकारांची बरसात करताना दिसेल.

शुभमन गिलच्या कॅप्टनशिपमध्ये झिम्बाब्वे दौऱ्यावर T20 मध्ये डेब्यु करणारा रियान पराग श्रीलंकेत पहिल्यांदा खेळणार आहे.

शिवम दुबे T20 वर्ल्ड कप विजेत्या भारतीय टीमचा भाग होता. पण तो श्रीलंकेत पहिल्यांदा खेळणार आहे.

वनडे, T20 मध्ये अर्शदीप सिंहने टीम इंडियात आपली जागा पक्की केली आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये तो यशस्वी गोलंदाज होता. अर्शदीपची श्रीलंकेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

रवी बिश्नोईला टीम इंडियाकडून T20 इंटरनॅशनल क्रिकेट खेळून 5 वर्ष झाली आहेत. श्रीलंकेत कुठला T20 सामना खेळताना तो पहिल्यांदा दिसेल.

मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा.
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर.
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी.
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती....
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती
नाशिक तपोवनमधील वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाकडून स्थगिती.
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात
केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; 2027 मध्ये जनगणना दोन टप्प्यात.
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?
महायुतीचा BMC साठी फॉर्म्युला ठरला, कुठं 100% युती? कोणाला किती जागा?.
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर
विधानभवन लॉबीतील राडा प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल सादर.
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?
कोण कुणाचे लाडके, उदय सामंत मुख्यमंत्र्यांचे की उपमुख्यमंत्र्यांचे?.
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य
वडेट्टीवार दुसऱ्या दिवशी सभागृहात भडकले, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्य.