IND vs SL : श्रीलंकेसाठी चौथा सामना प्रतिष्ठेचा, टीम इंडियाला रोखणार का?

India vs Sri Lanka Women 4th T20i: भारताने शुक्रवारी सलग तिसरा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. आता टीम इंडियाकडे रविवारी विजयी चौकार लगावण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंका विजयाचा खातं उघडणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे.

IND vs SL : श्रीलंकेसाठी चौथा सामना प्रतिष्ठेचा, टीम इंडियाला रोखणार का?
Harmanpreet Renuka Smriti Deepti Team India
Image Credit source: Bcci
| Updated on: Dec 27, 2025 | 10:51 PM

श्रीलंका वूमन्सने भारत दौऱ्यात टीम इंडियासमोर गुडघे टेकले आहेत. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात 5 सामन्यांची टी 20I मालिका खेळवण्यात येत आहे. श्रीलंका या मालिकेत 3 सामन्यांनंतर 0-3 ने पिछाडीवर आहे. टीम इंडियाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात सलग 3 सामने जिंकत ही मालिका आपल्या नावावर केली आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचा श्रीलंकेला व्हाईटवॉश करण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसर्‍या बाजूला श्रीलंकेसाठी उर्वरित दोन्ही सामने हे प्रतिष्ठेचे झाले आहेत. श्रीलंकेने उर्वरित दोन्ही सामने जिंकून सन्मानजनक कामगिरी करावी, अशीच आशा चाहत्यांना असणार आहे. मात्र तसं करताना श्रीलंकेचा चांगलाच कस लागणार आहे. श्रीलंकेचे गोलंदाज आणि फलंदाज पहिल्या तिन्ही सामन्यात ढेर झाले. त्यामुळे श्रीलंकेसमोर चौथ्या सामन्यात जिंकण्याचं आव्हान असणार आहे. हा चौथा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका चौथा टी 20I सामना कधी?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका चौथा टी 20I सामना रविवारी 28 डिसेंबरला होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका चौथा टी 20I सामना कुठे?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका चौथा टी 20I सामना तिरुवनंतरपुरममधील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका चौथ्या टी 20I सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका चौथ्या टी 20I सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका चौथा टी 20I सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका चौथा टी 20I सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका चौथा टी 20I सामना मोबाईल-लॅपटॉपवर कुठे पाहता येईल?

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका चौथा टी 20I सामना मोबाईल-लॅपटॉपवर जिओहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

दीप्ती शर्माच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड

दरम्यान टीम इंडियाची स्टार ऑलराउंडर दीप्ती शर्मा हीने श्रीलंकेविरुद्धच्या या मालिकेत टी 20I कारकीर्दीतील 150 विकेट्स पूर्ण केल्या. आता दीप्तीच्या निशाण्यावर वर्ल्ड रेकॉर्ड आहे. दीप्तीला टी 20I क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी 20I विकेट्स घेणारी गोलंदाज होण्याची संधी आहे. त्यासाठी दीप्तीला फक्त 1 विकेटची गरज आहे. सध्या हा विक्रम संयुक्तरित्या ऑस्ट्रेलियाची मेगन शट आणि दीप्ती शर्मा या दोघांच्या नावावर आहे. मेगननही टी 20I करियरमध्ये 151 विकेट्स मिळवल्या आहेत. त्यामुळे आता दीप्ती वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी सज्ज झाली आहे.