AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs UAE : यूएई विरुद्ध टॉस जिंकला, संजू-शुबमनबाबत सूर्याचा मोठा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?

India vs United Arab Emirates Toss Asia Cup 2025 : आशिया कप मोहिमेतील आपल्या पहिल्याच सामन्यात भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

IND vs UAE : यूएई विरुद्ध टॉस जिंकला, संजू-शुबमनबाबत सूर्याचा मोठा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
IND vs UAS Toss Asia Cup 2025Image Credit source: Social Media
| Updated on: Sep 10, 2025 | 8:13 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेतील दुसर्‍या सामन्यात ए ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने आहेत. टीम इंडिया विरुद्ध यूएई अर्थात संयुक्त अरब अमिराती या मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर मुहम्मद वसीम यूएईचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील या सामन्याला रात्री 8 वाजता दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कॅप्टन सूर्याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.

शुबमन आणि संजूचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश

शुबमन गिल याचं अनेक महिन्यांनंतर टी 20i संघात पुनरागमन झालं आहे. शुबमन आशिया कप स्पर्धेत उपकर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. तसेच प्लेइंग ईलेव्हनमध्ये संजू सॅमसन याचाही समावेश करण्यात आला आहे. संजूने गेल्या अनेक टी 20i मालिकेत ओपनिंग केली आहे. मात्र शुबमनच्या कमबॅकमुळे संजूच्या बॅटिंग पोजिशनमध्ये बदल करण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र कर्णधार सूर्याने टॉसनंतर संजू कितव्या स्थानी खेळणार? याबाबत माहिती दिली नाही. मात्र बॅटिंग ऑर्डर पाहता संजू्च्या जागी शुबमन गिल अभिषेक शर्मा याच्यासह ओपनिंग करणार आहे. त्यामुळे संजू कितव्या स्थानी खेळणार? हे फलंदाजीदरम्यानच स्पष्ट होईल.

अर्शदीप सिंह याला डच्चू

कॅप्टन सूर्या आणि टीम मॅनेजमेंटच्या एका निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. अर्शदीप सिंह याला संधी देण्यात आलेली नाही. तसेच स्टार फिनीशर रिंकू सिंह यालाही प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आलेली नाही.

भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), सूर्यकुमार यादव(कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्ती.

यूएई प्लेइंग ईलेव्हन : मुहम्मद वसीम (कर्णधार), अलिशान शराफू, मुहम्मद जोहैब, राहुल चोप्रा (विकेटकीपर), आसिफ खान, हर्षित कौशिक, हैदर अली, ध्रुव पराशर, मुहम्मद रोहिद खान, जुनैद सिद्दिकी आणि सिमरनजीत सिंग.

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.