AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दिग्गज क्रिकेटपटूंना विश्रांती, कुणाला संधी? जाणून घ्या…

IND vs ZIM : ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी या खेळाडूंनीही वनडे संघात पुनरागमन केलं आहे. भारताला 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

IND vs ZIM : झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, दिग्गज क्रिकेटपटूंना विश्रांती, कुणाला संधी? जाणून घ्या...
टीम इंडियाकडून संघाची घोषणाImage Credit source: social
Shubham Kulkarni
Shubham Kulkarni | Updated on: Jul 31, 2022 | 8:36 AM
Share

नवी दिल्ली : झिम्बाब्वेविरुद्ध (IND vs ZIM) 3 एकदिवसीय सामन्यांसाठी टीम इंडियानं संघ (Indian Cricket Team) जाहीर केलाय. भारतानं झिम्बाब्वे (Zimbabwe) दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची ही घोषणा केली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत शिखर धवन पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. या मालिकेतून मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या नावांचा समावेश आहे. त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी हे देखील संघात नाहीत. धवननं अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आणि कॅरेबियन भूमीवर प्रथमच वनडेमध्ये 3-0 असा क्लीन स्वीप केला. झिम्बाब्वेविरुद्ध भारताला चांगलीच तयारी करावी लागणार आहे. यासाठी सज्ज रहावं लागणार आहे. कारण, दिग्गज क्रिकेटपटूची फळी यावेळी नसणार आहे. याविषयी अधिक जाणून घ्या..

बीसीसीआयचं ट्विट

कुणाचं पुनरागमन?

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वेगवान गोलंदाज दीपक चहरचं वनडे संघात पुनरागमन झालं आहे. आयपीएल 2022 मध्ये तो जखमी झाला आणि तेव्हापासून तो क्रिकेटपासून दूर होता. त्यांच्याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी या खेळाडूंनीही वनडे संघात पुनरागमन केलं आहे. भारताला 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

भारताचा एकदिवसीय संघ : शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चहर.

कुणाला विश्रांती?

  1. या मालिकेतून मोठ्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत या नावांचा समावेश आहे.
  2. त्याचबरोबर हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी हे देखील संघात नाहीत.

टीम इंडिया सज्ज का?

  1. वनडे मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची ही घोषणा केली आहे
  2. वनडे मालिकेत शिखर धवन पुन्हा एकदा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे
  3. धवननं अलीकडेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आणि कॅरेबियन भूमीवर प्रथमच वनडेमध्ये 3-0 असा क्लीन स्वीप केला.
  4. झिम्बाब्वेविरुद्ध भारताला चांगलीच तयारी करावी लागणार आहे. यासाठी सज्ज रहावं लागणार आहे.
  5. दिग्गज क्रिकेटपटूची फळी यावेळी नसणार आहे.

ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी या खेळाडूंनीही वनडे संघात पुनरागमन केलं आहे. भारताला 18 ते 22 ऑगस्ट दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार