Bodybuilding Competition, Naresh Nagdev : उल्हासनगरचा बॉडीबिल्डर नरेश नागदेवची जागतिक भरारी, 23 वर्षांच्या मेहनतीचं अखेर चीज

Bodybuilding Competition, Naresh Nagdev : उल्हासनगरचा बॉडीबिल्डर नरेश नागदेव यानं आशियाई बॉडीबिल्डिंग स्पर्धेत 40 वर्षावरील वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळं त्याच्यावर सध्या नरेशवर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. 

Bodybuilding Competition, Naresh Nagdev : उल्हासनगरचा बॉडीबिल्डर नरेश नागदेवची जागतिक भरारी, 23 वर्षांच्या मेहनतीचं अखेर चीज
बॉडीबिल्डर नरेश नागदेवImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 7:52 AM

ठाणे : उल्हासनगरचा बॉडीबिल्डर नरेश नागदेव (Naresh Nagdev) यानं आशियाई बॉडीबिल्डिंग स्पर्धेत (Asian Bodybuilding Competition) 40 वर्षावरील वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला आहे. त्यामुळं त्याच्यावर सध्या अभिनंदनाचा वर्षाव होतोय. आशियाई बॉडीबिल्डिंग स्पर्धा मालदीवमध्ये नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत 25 देशांमधील अनेक बॉडीबिल्डर (Bodybuilder) सहभागी झाले होते. यात भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या उल्हासनगरच्या नरेश नागदेव यानी पाचवा क्रमांक पटकावला आहे. त्याच्या या यशाबद्दल उल्हासनगरच्या त्याच्या जिममध्ये सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्याचं अभिनंदन केलं. यापुढे भारतासाठी गोल्ड मेडल जिंकण्याची इच्छा यावेळी नरेश यानं व्यक्त केली आहे. नरेशच्या कामगिरीची चांगलीच चर्चा आहे.

23 वर्षांपूर्वी सुरुवात….

नरेश यांनी 23 वर्षांपूर्वी व्यायामाला सुरुवात केली. त्यानंतर अवघ्या दोनच वर्षात त्यानं विविध स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली. सध्या नरेश हा 40 वर्षांवरील वयोगटात बॉडीबिल्डिंग करत असून आत्तापर्यंत त्यानं मास्टर महाराष्ट्र श्री स्पर्धेत सिल्व्हर मेडल, मिस्टर इंडिया स्पर्धेत सिल्व्हर मेडल आणि वेस्टर्न मिस्टर इंडिया स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकलं आहे.

हायलाईट्स

  1. आशियाई बॉडीबिल्डिंग स्पर्धा मालदीवमध्ये नुकतीच झाली
  2. या स्पर्धेत 25 देशांमधील अनेक बॉडीबिल्डर सहभागी झाले होते
  3. हे सुद्धा वाचा
  4. भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या उल्हासनगरच्या नरेश नागदेव यानी पाचवा क्रमांक पटकावला
  5. भारतासाठी गोल्ड मेडल जिंकण्याची इच्छा यावेळी नरेश यानं व्यक्त केली आहे
  6. नरेशच्या कामगिरीची चांगलीच चर्चा आहे.
  7. अनेकांसाठी प्रेरणादाई

इच्छा असली की काहीही अशक्य नाही, असं नेहमी म्हटलं जातं. कोणत्याही वयात अगदी काहीही शिकता येतं. वयाचं बंधन कशालाही किंवा कुठेही येत नाही. असंच एक सकारात्मक उदाहरण उल्हासनगरमधून समोर आलंय. उल्हासनगरमधील एका बॉडी बिल्डरची जागतिक भरारी समोर आली आहे. नरेश नागदेव यांना 23 वर्षांपासून घेत असलेल्या मेहनतीचं फळ मिळालंय. वयाच्या 44व्या वर्षी मिस्टर वर्ल्डसाठी नरेश यांची निवड करण्यात आली होती . विशेष म्हणजे नरेश हे 23 वर्षांपासून घेत असलेल्या मेहनतीचा हा परिपाक आहे. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी किंवा कोणतही यश साध्य करण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागते. मात्र,  मागच्या अनेक वर्षांपासून नरेश हे करत असलेल्या मेहनतीतून त्यांना यश मिळालंय. त्यांचं उदहारण अनेकांसाठी प्रेरणादाई आहे.

नरेश नागदेवच्या यशाबद्दल उल्हासनगरच्या त्याच्या जिममध्ये सहकारी आणि विद्यार्थ्यांनी त्याचं अभिनंदन केलं. यापुढे भारतासाठी गोल्ड मेडल जिंकण्याची इच्छा यावेळी नरेश यानं व्यक्त केली आहे. नरेशच्या कामगिरीची चांगलीच चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....