CWG 2022, Ind vs Pak Women Match Updates : राष्ट्रकुलमध्ये आज भारत-पाकिस्तान भिडणार, दोन कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये चुरशीची लढत

CWG 2022, Ind vs Pak Women Match Updates : कॉमनवेल्थ गेम्सच्या क्रिकेट स्पर्धेत आज दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची लढत होत आहे. अर्थात ही स्पर्धा दोन्ही देशांच्या महिला संघांमध्ये आहे. 

CWG 2022, Ind vs Pak Women Match Updates : राष्ट्रकुलमध्ये आज भारत-पाकिस्तान भिडणार, दोन कट्टर प्रतिस्पर्धींमध्ये चुरशीची लढत
Ind vs Pak Women MatchImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 31, 2022 | 7:24 AM

नवी दिल्ली : आज रविवार नसून सुपर संडे आहे. बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टनमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये (CWG 2022) आज मोठ्या लढती पाहायला मिळणार आहेत. या युद्धात विजय पणाला लागणार. यासाठी भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak Women Match) लढताना दिसतील. कॉमनवेल्थ गेम्सच्या (Commonwealth Games 2022) क्रिकेट स्पर्धेत आज या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची लढत होत आहे. अर्थात ही स्पर्धा दोन्ही देशांच्या महिला संघांमध्ये असली तरी रोमांच अजिबात कमी नाही. आजही श्वास थांबलेला असणार आहे. आजही सामन्याकडे मोठ्या आशेनं पाहिलं जातंय. कारण आज हरायला भारताला मनाई आहे. आज हरायचे नाही, हरवायचे आहे. हरमनप्रीत कौर अँड कंपनीला फक्त याच उद्देशानं मैदान-ए-जंगमध्ये उतरावं लागणार आहे. दोन्ही संघांचा ग्रुप स्टेजवरील हा दुसरा सामना असेल. तत्पूर्वी पहिल्या सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाकडून 3 गडी राखून पराभव झाला होता. तर बार्बाडोसच्या संघाला पाकिस्तान समजलं नाही. भारत आणि पाकिस्तान सध्या गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. या दोघांचा रन रेटही मायनसमध्ये आहे. मात्र, भारताची स्थिती पाकिस्तानपेक्षा थोडी चांगली आहे.

टीम इंडिया पाकिस्तानचं तिकीट कापणार

आता अशा परिस्थितीत भारतीय संघानं आज पाकिस्तानला हरवलं तर पाकिस्तानच्या अडचणी वाढणार आहेत. त्यानंतर पाकिस्तान संघ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न जाण्याची आणि मायदेशी परतण्याची तयारी करण्याची शक्यता अधिक असेल. त्याचवेळी हा विजय भारतीय संघाला उपांत्य फेरीत जाण्याचा रस्ता तयार करताना दिसणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे विशेष लक्ष असणार आहे.

काल राष्ट्रकुलमध्ये काय झालं?

कालच्या दिवसातील इतर तीन वेटलिफ्टिंग स्पर्धेतही भारतानं पदके जिंकली. संकेतनं या खेळांमधील पहिलं पदक जिंकलं. 21 वर्षीय भारतीय वेटलिफ्टरने शेवटच्या लिफ्टपर्यंत संपूर्ण स्पर्धेत पहिलं स्थान राखलं होतं. परंतु मलेशियाच्या भारोत्तोलकानं अवघ्या एक किलो अधिक वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. संकेत दुखापतीमुळेही वजन वाढवू शकला नाही आणि 248 किलोसह रौप्यपदक जिंकलं. त्यानंतर पुढच्याच स्पर्धेत गुरुराजा पुजारीनं 269 किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकलं. मागील सामन्यांमध्ये त्यानं रौप्यपदक जिंकलं होतं. भारताची सर्वात मोठी आशा आणि टोकियो ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाई चानू हिनं अजिबात निराश केले नाही आणि 202 किलो वजनासह देशाचे पहिलं सुवर्ण जिंकलं.

आज हरायचं नाही, हरवायचंय

आजही सामन्याकडे मोठ्या आशेनं पाहिलं जातंय. कारण आज हरायला भारताला मनाई आहे. आज हरायचे नाही, हरवायचे आहे. हरमनप्रीत कौर अँड कंपनीला फक्त याच उद्देशानं मैदान-ए-जंगमध्ये उतरावं लागणार आहे. दोन्ही संघांचा ग्रुप स्टेजवरील हा दुसरा सामना असेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.